Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदूर येथील सर्व पत्रकारांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र गडचांदूरच्या वतीने आयोजन शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तु देऊन केला सन्मान आमचा विदर्भ - धनराजसिंह ...

मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र गडचांदूरच्या वतीने आयोजन
शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तु देऊन केला सन्मान
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. 11 जानेवारी 2024) -
मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र राजुरा विधानसभा यांच्या वतीने 9 जानेवारीला गडचांदूर शहरातील वृत्तपत्र प्रतिनिधी तथा पोर्टल प्रतिनिधी यांचा राजुरा विधानसभा निवडणूक प्रभारी देवरावदादा भोंगळे (Devravdada Bhongle) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देवरावदादा भोंगळे यांनी यावेळी पत्रकारांचे लोकशाहीतील महत्व आणि पत्रकारांच्या अडचणी याविषयी विचार मांडले. भारतीय जनता पार्टीच्या गडचांदूर बस स्थानकाजवळील नवीन कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (Sudhir Bhau Mungantiwar Seva Kendra Rajura)

राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना संबोधित करत म्हणाले की, "लेखणीच्या माध्यमातून समाजातील दिन, दुर्बल, शोषीत लोकांना न्याय देण्याचे काम पत्रकार करत असतो. शासन प्रशासनावर अंकुश ठेवत, समाजातील ज्वलंत प्रश्नांवर बोट ठेवून ते सोडवण्यासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी पत्रकार बांधव नेहमीच काम करतो. या पत्रकारांच्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या निमित्ताने पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यासाठी 'सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, गडचांदूरच्या वतीने समस्त पत्रकार बांधवांचे आभार मानत उपस्थित सर्व पत्रकारांचे शॉल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केले. या वेळी उपस्थित सर्व पत्रकारांना भेट स्वरूप थंड पाण्याची कैन देण्यात आली. 

वरिष्ठ पत्रकार नासिर खान आणि शंकर तडस यांनी मनोगत व्यक्त करुन आयोजित पत्रकार सत्कार कार्यक्रमासाठी समस्त पत्रकांरा तर्फे मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, गढ़चांदुरचे आभार व्यक्त केले. या वेळी  सत्कार करण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये वरीष्ठ पत्रकार के.के. श्रीवास्तव, सिद्धार्थ गोसावी, शंकर तडस, रवींद्र नगराळे, नासिर खान, दिपक खेकारे, शैलेश लोखंडे, मुमताज अली, सतीश बिडकर, उद्धव पूरी, गणेश लोंढे़, धनराज सिंह शेखावत, शिवाजी सेलोकर, रवी बंडीवार, गौतम धोटे, मयूर एकरे सहित अनेक पत्रकारांचा समावेश होता. यावेळी रामसेवक मोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपाचे गडचांदूर शहर अध्यक्ष सतीश उपलंचीवार, शहर महामंत्री हरीशजी घोरे, ज्येष्ठ नेते महेशजी शर्मा, महादेवराव एकरे, अरुण डोहे, सौ. विजयलक्ष्मी डोहे, निलेश ताजने, गोपाल मालपानी, निलेश एकरे, राकेश अरोरा, हितेश चव्हाण, सत्यदेव शर्मा आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. (gadchandur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top