Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वन्यप्राणी चितळ शिकार प्रकरणात तिघांना अटक तर तीन फरार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १९ डिसेंबर २०२३) -         मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र टेंबुरवाही मध...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १९ डिसेंबर २०२३) -
        मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र टेंबुरवाही मधील नियतक्षेत्र टेंबुरवाही मध्ये दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी संतोष मधुकर संगमवार, क्षेत्र सहाय्यक, टेंबुरवाही यांना टेंबुरवाही गावामध्ये सिर्सी गावातुन वन्यप्राणी चितळाचे मांस विक्री करण्याकरीता आणले असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून टेंबुरवाही येथील विनोद सुधाकर खनके पोलीस पाटील, कु. व्हि.सी.वाघ नियत वनरक्षक, सिर्सी, बि.आर. दांडेकर, नियत वनरक्षक, टेंबुरवाही, पि.डब्ल्यु. देशमुख, नियत वनरक्षक, खांबाळा, ए.एन.पोले, नियत वनरक्षक, तुलाना यांना सोबत घेवुन आरोपी नामे प्रविण लक्ष्मण गुरूनुले, अरुण मारोती कोटनाके, रा. टेंबुरवाही यांच्या घरी जावुन झडती घेतली असता त्यांच्या घरी वन्यप्राणी चितळाचे मांस आढळले मांस जप्त करुन त्यांना चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले. (Madhya Chanda Forest Division Rajura Forest Range)

        सुरेश ज्ञा. येलकेवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजुरा यांच्या मार्गदर्शनात सिर्सी गावात जावुन वन्यप्राणी चितळाचे मांस विक्री करणारे मुख्य आरोपी नामे विनोद सोमा तोडासे, रा. सिर्सी याला ताब्यात घेवुन न्यायालयात हजर करण्यात आले सदर गुन्हयातील आरोपी नामे अर्जुन किसन आत्राम, एकनाथ मानकु कुळमेथे, लिंगु धर्मा पुसाम, रा. सिर्सी हे फरार असुन श्वेता बोड्ड, उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर व संदिप लंगडे, उपविभागीय वनअधिकारी, राजुरा (अतिरिक्त कार्यभार) यांच्या मार्गदर्शनात पुढील चौकशी सुरू आहे. (aamcha vidarbha) (rajura)





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top