Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता आलेल्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावत मारहाण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पत्रकार नात्याने मारहाण घटनेचा जाहीर निषेध वारंवार प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकाराला भोवला आमचा विदर्भ - दीपक शर्मा  गडचांदूर (द...

पत्रकार नात्याने मारहाण घटनेचा जाहीर निषेध
वारंवार प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकाराला भोवला
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
गडचांदूर (दि. 22 डिसेंबर 2023) -
        गडचांदूरात J पॅलेस बार & रेस्टॉरंट (J Palace Bar & Restaurant) विरोधात शासनाची दिशाभूल करण्यासंबंधी प्रसार माध्यमात बातम्या प्रकाशित होत होत्या. यासंदर्भात आमचे सहकारी पत्रकार धनराजसिंह शेखावत यांनी गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद जोगी यांना प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता संपर्क केला. जोगी यांनी त्यांच्या रेस्टारंट मध्ये बोलाविले, सायंकाळी आमचे सहकारी धनराजसिंह शेखावत यांच्या समवेत तिथे जाऊन जोगी याना शासनाची दिशाभूल करण्यासंबंधी प्रसार माध्यमात बातम्या प्रकाशित होत असल्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेण्यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी याबद्दल सध्या काहीही भाष्य करू नका अशी विनवणी केली. जोगी यांची याविषयी भाष्य करण्याची इच्छा नसल्याचे बघवत आम्हीही तिथून निघण्याच्या तयारीत असताना एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी गणेश लोंढे हे तिथे आले. गणेश लोंढे यांनीही जोगी यांना प्रतिक्रिया देण्यासंबंधी बोलणे केले. जोगी यांनी त्यांनाही सध्या काहीही भाष्य करू नका अशी विनवणी केली. मात्र लोंढे यांनी त्यांना सांगितले कि मला "वरून" वारंवार प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता फोन येत आहे तुम्ही प्रतिक्रिया द्या म्हटले, जोगी यांनी त्यांनाही शांतपणे याबद्दल सध्या काहीही भाष्य करू नका अशी विनवणी केली. मात्र लोंढे यांनी तुम्ही तुमचे म्हणणे सांगा असे म्हणत त्यांचे म्हणणे व्हिडीओ स्वरूपात घेण्याकरिता बऱ्याच वेळा मोबाईल त्यांच्या तोंडाकडे केला. अचानक जोगी यांचा राग अनावर झाला व त्यांनी लोंढे यांचा मोबाईल हिसकावत जमिनीवर पटकला व लोंढे यांना हाताने मारहाण केली. अचानक घडलेल्या या घटनेने आम्ही ही स्तब्ध झालो. मात्र भान येताच त्वरित धनराजसिंह यांनी मधात पडून दोघांना अलग करून दोघांना शांत केले. प्रकरणाविषयी दारी आलेल्या पत्रकारांला शिवीगाळ करत मारहाण करणे हे अति निंदनीय असून पत्रकार नात्याने आम्हीही ह्या घटनेचा निषेध करतो. शरद जोगी सारख्या वरिष्ठ राजकारणी व्यक्तिमत्व असलेल्या आणि नप उपाध्यक्ष सारख्या उच्च पदावर आसीन व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते. तसेच पत्रकारांनी सुद्धा कोणत्याही प्रकरणात समोरच्या व्यक्तिला न चिढवता त्याची मनःस्थिती ओळखूनच त्याला विचारणा करणेही तितकेच महत्वाचे होते. मात्र कुणाच्याही नाजूक प्रकरणात पत्रकारांनी पत्रकारितेचा अतिरेक केला तर असे प्रकार घडत असतात हे मात्र येथे विशेष. (Journalists were abused and beaten) (aamcha vidarbha) (gadchandur)

        काल झालेल्या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिस अधिक्षक, चंद्रपूर यांना पण तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी कडक कारवाई करावी. या पुढे अशी घटना नाही घडली पाहिजे अशीही मागणी करण्यात आली आहे. 
गणेश लोंढे, पत्रकार

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top