Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: झाडांवर लावलेले अनाधिकृत बॅनर तात्काळ काढा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे नेफाडो ने केली मागणी राजुरा शहरातील जुन्या वृक्षांची गणना करून हेरिटेज ट्री घोषित करत वृक्षांचे संरक्षण आणि...

मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे नेफाडो ने केली मागणी
राजुरा शहरातील जुन्या वृक्षांची गणना करून हेरिटेज ट्री घोषित करत वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २३ डिसेंबर २०२३) -
        राजुरा हे चंद्रपूर जिल्ह्यातील जुन्या शहरांपैकी एक महत्वाचे शहर आहे. राजुरा निझामकालीन संस्थानातील असल्याने शहराची बरीचशी संरचना त्याप्रमाणे दिसून येते. या शहराला तेलंगाणा राज्यातून येणारे दोन मार्ग आहेत. त्यापैकी आसिफाबाद, मंचेरीयाल कडून येणारा मार्ग हा जास्त वर्दळीचा आहे. या मार्गावर राजुरा हद्दीत कळूनिंबाची जवळपास शेकडो मोठे वृक्ष आजही डोलदारपणे उभी आहेत. विशेष म्हणजे हे वृक्ष निझामकालिन असून त्यांचे वय सत्तर ते अंशी वर्ष आहे. तसेच शहरात बस स्थानक, जिल्हा परिषद शाळा, बीएसएनएल कार्यालय, सोमेश्वर मंदिर, माता मंदिर आणि अन्य वार्डातही बरीच वड, पिंपळ, कळूनिंब व इतर प्रजातिची मोठी जुनी वृक्ष आहेत. अशा सर्व जुन्या वृक्षांना द महाराष्ट्र अर्बन एरिआस प्रोटेक्शन अँड प्रिवेशन ऑफ ट्री ऍक्ट १९७५ मधील १६ जुलै २०२१ च्या संशोधनानुसार या वृक्षांची गणना करून त्यांना हेरिटेज ट्री चा दर्जा मिळाल्यास भविष्यातील संभाव्य जुन्या वृक्षांची वृक्षतोड होण्यापासून वाचविण्यात येईल तसेच त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात महत्वाचे योगदान ठरेल. सदर कायद्यातील तरतुदीनुसार व स्वच्छ राजुरा सुंदर राजुरा, हिरवेगार व पर्यावरण पूरक राजुरा शहर ठेवण्यासाठी राजुरा नगर परिषदेने ही संकल्पना तात्काळ राबविण्याची आवश्यकता आहे. तसेच शहरातील ग्रीन कव्हर कायम ठेवून ते वाढविण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी आणि शहारातील वृक्षांवर लागलेले अनाधिकृत बॅनर ब्यानार तात्काळ काढावे तसेच यापुढे राजुरा शहरात वृक्षांवर बॅनर लावणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक व फोजदारी कार्यवाही करावी अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राजुराच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांना देण्यात आले. प्रशासकीय अधिकारी नगर परिषद राजुरा संदीप वानखेडे यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोहनदास मेश्राम, राजुरा तालुकाध्यक्ष अनंत डोंगे, अँड. शंतनू देशमुख, बबलू चव्हाण, युवा राज्याध्यक्ष संगीता पाचघरे, महिला संघटिका, रवी बुटले, प्रथमेश कडुकर, राजुरा तालुका संघटक आदींची उपस्थिती होती. (Nefado made a demand through a statement to the Principal) (rajura) (aamcha vidarbha)
        राजुरा शहराचे सौंदर्य वाढविणारे हे जुने वृक्ष आहेत. अश्या जुन्या वृक्षांना हेरिटेज ट्री म्हणून घोषित करावे आणि त्यांचे संरक्षण व संवर्धन करावे. तसेच वृक्षांवर अनाधिकृतपणे बॅनर लावलेले आहेत ते तात्काळ काढण्यात यावे आणि यापुढे कोणत्याही वृक्षांवर बॅनर लागल्यास संबंधीत व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
बादल बेले, महाराष्ट्र अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था

(Enumerate old trees in Rajura city and declare heritage trees to protect and conserve trees)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top