Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नांदा येथे जोमात सुरू आहे अनाधिकृत लेआऊट चा धंधा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भूमाफियांवर करवाई न झाल्यास आमरण उपोषणची तयारी मनसेचे जिल्हा सचिव व नांदा ग्रापं सदस्य चंद्रप्रकाश बोरकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन आमच...

भूमाफियांवर करवाई न झाल्यास आमरण उपोषणची तयारी
मनसेचे जिल्हा सचिव व नांदा ग्रापं सदस्य चंद्रप्रकाश बोरकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २६ डिसेंबर २०२३) -
        कोरपना तालुक्यातील नांदा गावाचा झपाट्याने विकास होत असल्याने भूमाफिया शासनाची दिशाभूल करत व कोणतीही परवानगी न घेत अनाधिकृत लेआऊट टाकून परस्पर विकली जात आहे. यामुळे येथील अनाधिकृत भूमाफियांवर दंडात्मक कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण करणार अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव व नांदा ग्रापंचायत सदस्य चंद्रप्रकाश बोरकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

        नांदा-गडचांदूर परिसरात अनेक सिमेंट उद्योग असल्याने मागील काही महिण्यापासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ कृषक जमिनीवर अनाधिकृत लेआऊट टाकून सर्रास राजरोसपणे विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे या करिता शासनाची कोणतीही परवानगी न घेता प्लॉट विकण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. (Preparation of fast to death if no action is taken against land mafia)

        भूमाफिया कृषक जागेवर लेआऊट टाकून नागरिकांना गुंठेवारी पद्धतीने ४०० ते ५०० स्के. फुट प्रमाणे विकणे सुरू आहे. गरजू नागरिकांना पकडून हमीपत्र देवून त्याचा कडून जागेची रक्कम घेत असल्याची खात्रीदायक माहिती आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आहे. या अनाधिकृत लेआऊट मुळे भविष्यात रस्ते नाल्या विद्युतिकरण पाणी व्यवस्था अशा मूलभूत सुविधेसाठी नांदा ग्राम पंचायतीवर याचा आर्थिक बोझा पडणार असून हे परवडण्या जोगे नसल्याने अश्या अनाधिकृत लेआऊटवर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषणा करणार अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव व नांदा ग्रामपंचायत सदस्य चंद्रप्रकाश बोरकर यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे. (nanda phata) (gadchandur) (aamcha vidarbha)
सदर जागा मी बल्लारपुर येथील व्यक्तीला विक्री केली आहे, पण प्रशासना कडून परवानगी नाही मिळाली असल्याने अजून ही जागा माझ्या नावानेच आहे. 
मोहम्मद वशिम वल्ली मोहम्मद बेग, शेतमालक, सर्वे नं. १९/३ रा. गडचांदूर

आम्ही फक्त प्लॉट पाडले आहे, अजूनपर्यंत प्लॉट विक्री सुरू केली नाही
शुभम दिलीप शास्त्रकार, शेत मालक रा. चंद्रपूर

अवैधरित्या लेआऊट टाकुन प्लॉट विक्री संदर्भात तक्रार मिळाली आहे. वास्तविक पाहता महसूल विभागाने याकडे लक्ष देने गरजेचे आहे. तरी पण जिल्हाधिकारी व संबंधित विभागाची रितसर परवानगी घेऊन लेआऊट टाकून प्लॉट विक्री करावी असा नोटीस प्लॉट मालकाला देण्यात येत आहे.
श्रीहरी केंद्रे, ग्रामविकास अधिकारी, नांदा

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top