Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: किडझी आणि ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिकोत्सव साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २६ डिसेंबर २०२३) -         स्थानिक किडझी आणि ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक उत्सव साजरा करण्यात आल...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २६ डिसेंबर २०२३) -
        स्थानिक किडझी आणि ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमात जिप माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, तहसीलदार ओमप्रकाश गोंड, सिद्धी विनायक एजुकेशन सोसायटी चे अध्यक्ष विनायक चिल्लावार, उपाध्यक्ष संध्या चिल्लावार, संचालक स्वप्नील चिल्लावार, स्वप्नील चिल्लावार, बोंडे सर, जेष्ठ नागरिक संघाचे सुदर्शन दाचेवार, प्रतिष्ठित व्यापारी राजेंद्रप्रसाद झंवर, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी किरण दुमने, प्रा. संजय गोरे, व्यापारी अशोसिएशन चे अध्यक्ष संदीप जैन, भावना रागीट प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. (Educational) (Kidzie and Orchid International School)

        या कार्यक्रमात महिला शक्तीचा गौरव करून बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत दरवर्षी ५ गरजू विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याची शपथ घेण्यात आली. देवराव भोंगळे यांनी ऑर्किड शाळेचा उल्लेख शहरातील नामवंत शाळा असा केला व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक महत्त्वाच्या असलेल्या शाळेत आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका सिमा आमटे व मोनाली गुंटीवार यांच्या नियोजनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शेकडोंच्या संख्येत पालकवर्ग उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top