Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय सुधारणा वाढीसाठी प्रयत्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्ह्यात मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान आमचा विदर्भ - राहुल पडवेकर, प्रतिनिधी राजुरा (दि. २६ डिसेंबर २०२३) -         शा...

जिल्ह्यात मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान
आमचा विदर्भ - राहुल पडवेकर, प्रतिनिधी
राजुरा (दि. २६ डिसेंबर २०२३) -
        शालेय शिक्षणात भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय सुधारणा अधिक गतीने व्हावी, यासाठी राज्यात ४५ दिवसांचे मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविण्यात येत आहे. शासनाचे अभियान राबविताना तंबाखूमुक्त शाळा, प्लास्टिकमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा याचा विचार अशा अभियानातून प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (mukhyamantri majhi shala sundar shala abhiyan)

        चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन माध्यमांच्या शाळांमधून मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाने काढलेल्या आदेशात भौतिक सुविधा निर्माण करणे, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, प्रशासकीय सुधारणेत गतिमानता यावी, असा उद्देश ठेवण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतंर्गत भौतिक सुविधांचे निर्माण व्हावे या हेतूने अभियान राबविण्यात येत आहे. तंबाखूमुक्त शाळा शाळेपासून किमान २०० मीटर अंतरावर तंबाखु व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस बंदी आहे. शालेय परिसरात अशा बाबींवर शाळांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. प्लास्टिक मुक्त शाळा पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टिकचा वापर शाळेच्या आवारात अथवा कामकाजात होणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घेत विद्यार्थ्यांना याबाबत जागृत करीत प्लास्टिकचा कसा वापर टाळता येईल, याबाबत उपक्रम राबवावे लागणार आहे. (aamcha vidarbha) (rajura)

■ अभियानाची उद्दिष्टे...
        शैक्षणिक गुणवत्ता विकास, अध्ययन- आध्यापरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरास प्रोत्साहन.  आनंददायी व पर्यावरण पुरक वातावरण निर्मिती. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेला प्राधान्य,  विद्यार्थी अंगभूत गुणांना प्रोत्साहन. विद्यार्थी, पालक, माजी विद्यायांत कृतज्ञतेची व उत्तरदायित्व भावना निर्माण करणे. विद्यारयांमध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन, गुंतवणूक, बँकाचे व्यवहार, कर्ज व व्याज प्रणाली इत्यादी बाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरिता यूपीआय 'सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी बाबत तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले जाणार आहे. स्वयंरोजगार, व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करिअर्स घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्व विद्याथ्यांना पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहारातील शिलक अजावर योग्य ती प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी अभिनव उपक्रम कसा राचविला याची माहिती शाळांना द्यावी लागणार आहे. विद्यार्थीकेंद्रित उपक्रम तसेच शाळा व्यवस्थापनांनी आयोजित करावयाचे उपक्रम पामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी संस्था इत्यादींचा शक्य असेल त्याठिकाणी अधिकाधिक सहभाग वाढवावा लागेल. व्याख्यान्यात अशा अभ्यासक्रमांची ओळख, शिक्षण देणान्या संबंधित संस्था, प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील संधी इत्यादीबाचतची माहिती अमाधी यासाठी विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.

■ भौतिक सुविधा तसेच अध्यापन व अध्ययनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कॉपोरेट कंपन्या, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती इत्यादी घटकांकडून वस्तू व सेवा यांच्या स्वरुपात अधिकाधिक देणगी गोळा करण्यासाठीचे प्रयत्न शाळांना करावे लागणार आहेत.
जिल्ह्यातील शाळांमधून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राचविण्यात येणार आहे. अभियानाबाबत मार्गदर्शक सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. प्रभावीपणे अभियान यशस्वी करण्यासाठी शाळांमधून प्रयत्न केले जातील.
- कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी, चंद्रपूर

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top