Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सांस्कृतिक मेजवानीने रंगणार राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्सचाही समावेश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार भव्यदिव्य शुभारं...

फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्सचाही समावेश
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार भव्यदिव्य शुभारंभ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २६ डिसेंबर २०२३) -
        ‘मिशन ऑलिम्पिक 2036’ (Mission Olympics 2036) हे एकच ध्येय डोळ्यांपुढे ठेवून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होत आहेत. यासाठी मा. ना. मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करून घेतले आहे. उद्घाटन सोहळा सांस्कृतिक मेजवानीचे रंगणार असून स्पर्धेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे दर्शन खेळाडूंना घडणार आहे. (Including fire show, laser show, acrobatic dance)

        27 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन (Chief Minister Eknathji Shinde) मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

        शुभारंभ समारंभात फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य आकर्षण राहणार आहे. 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत बल्लारपूर येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताचे चंद्रपूर व बल्लारपूर नगरीचा चेहरामोहरा बदलला आहे. विविध चौकांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. विविध संकल्पनावर आधारित रंगबेरंगी चित्रांनी भिंती फुलल्या आहेत. अखिल भारतीयस्तरावरील या स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज झाली आहे. (The grand opening will be held in the presence of Chief Minister, Deputy Chief Minister and Guardian Minister of the district)

शाल्मली खोलगडे गाणार ‘लाइव्ह’
मुख्य उद्घाटन सोहळ्यात 27 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता प्रसिद्ध सिनेगायिका शाल्मली खेालगडे यांचा लाइव्ह संगीत परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच फायर शो, लेझर शो, अक्रोबाईट डान्स आणि ढोल ताशांचा गजर करण्यात येणार आहे.  

‘एक शाम खिलाडीयों के नाम’
28 डिसेंबरला सायंकाळी 6.30 वाजता गीत आणि नृत्याचा समावेश असलेल्या ‘एक शाम खिलाडीयों के नाम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पार्श्वगायक मोरेश्वर निस्ताने, श्रुती जैन (सूर नवा ध्यास नवा फेम), स्वस्तिका ठाकूर (कलर्स रायजिंग फेम) व सागर मधुमटके, संगीत संयोजन पंकज सिंग व नृत्य दिग्दर्शन सचिन डोंगरे हे कलाकार सहभागी होतील.

शिववंदना, महाराष्ट्राची लोकधाराही वेधणार लक्ष
महाराष्ट्राच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा, शिववंदना व महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम 29 डिसेंबरला सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. यात सुमारे 300 लोककलावंत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राची विविध संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमातून घडेल. गणेशवंदना, जागर गोंधळ, शाहिरी, भक्ती-शक्ती संगम, कोळी नृत्य व  शिवराज्यभिषेक सोहळ्याचे सादरीकरण यावेळी उपस्थिताना पाहता येईल. 

‘कलर्स ऑफ इंडिया’चीही क्रेझ 
30 डिसेंबरला 350 कलाकार देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. भव्यदिव्य स्वरूपात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ‘थीम साँग’ तयार करण्यात आले आहे. या गाण्याला प्रसिद्ध पार्श्वगायक कैलाश खेर यांनी स्वर दिला आहे. ‘आओ चंद्रपूर, खेलो चंद्रपूर... खेलो ऐसा दिल लेलो चंद्रपूर...’ असे शब्द असलेले हे गीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची पेरणी करणारे ठरत आहे. लक्षवेधक शब्द, जोशपूर्ण संगीत आणि कैलाश खेर यांचा भावगर्भित आवाज हे या ‘थीम साँग’ची वैशिष्ट्य ठरत आहे. प्रसिद्ध अभिनेते सलमान खान आणि आमिर खान यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा संदेश प्रसारीत केले आहेत. (sports) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top