Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रोटरी क्लब राजूराच्या वतीने गरजूंना सायकल वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २७ डिसेंबर २०२३) -         रोटरी क्लब राजुराच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरित करण्यात आली. ह...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २७ डिसेंबर २०२३) -
        रोटरी क्लब राजुराच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरित करण्यात आली. हा सोहळा न्यू ऐरा इंग्लिश हायस्कूल (New Era English High School) येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक बाबु शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा शहरातील प्रसिद्ध उद्योजक राजेंद्रप्रसाद झंवर होते. तसेच मंचावर रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष कमल बजाज व न्यू ऐरा शाळेच्या शिक्षिका विना देशकर उपस्थित होत्या. अध्यक्ष स्थानावर बोलताना बाबु शेख यांनी रोटरी क्लब राजुरा करत असलेल्या कामाची प्रसंशा केली. रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष कमल बजाज यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. (Rotary Club Rajura)

        कार्यक्रमाला रोटरी क्लब राजुराचे सदस्य किरण ढुमणे, किशोर हिंगाणे, मयूर बोनगीरवार, अमोल कोंडावार, अजहर शेख, आनंद चांडक, निखिल चांडक, निखिल शेरकी, अभिषेक गंपावार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अँड. जीवन इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन नवल झंवर यांनी केले. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top