Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: साहेब, नांदा-गडचांदूर परिसरातील अवैध रेती वाहतुकीवर आळा कधी बसणार हो..?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मंडळ अधिकारी व तलाठी संबंध जोपासन्यात मग्न आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी  कोरपना (दि. १८ डिसेंबर २०२३) -          नांदा-ग...

मंडळ अधिकारी व तलाठी संबंध जोपासन्यात मग्न
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी 
कोरपना (दि. १८ डिसेंबर २०२३) - 
        नांदा-गडचांदूर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. एकीकडे नवनियुक्त तहसीलदार यांनी राष्ट्रीय महामार्ग बनविणाऱ्या कंपनीच्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक जप्त करून कारवाई केली, मात्र दुसरीकडे  स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना अनेक लोकांनी माहिती देऊनही याकळे मुद्दाम कानाडोळा करत असल्याने त्यांच्या या भूमिकेकडे नागरिक आता संशयाने बघत आहे. (Illegal sand transport) (Nanda-Gadchandur area)

        गडचांदूर-नांदा परिसर हा औद्योगिक भरभराटीस येत आहे. त्यामुळे परिसरात चांगल्या दर्जाची रेतीची नेहमीच मागणी असते याचाच फायदा घेत अवैध रेती व्यवसायिक आपला डाव साधत असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील नांदा, आवाळपूर, कढोली, आसन, धामणगाव, येथील नाल्याला सुद्धा चांगल्या प्रकारची रेती आहे. या नाल्यातील अवैध उपसा करून काळी रेती वाहतूक केली जात असून ही रेती शासकीय कामात काँक्रिटीकरण व भराईसाठी सर्रास वापरली जात आहे. गडचांदूर, नांदा, आवारपूर परिसरात अनेक ठिकाणी रात्रीला हाइवाने रेती आणून साठा करून नंबर प्लेट नसलेल्या ट्रैक्टर ट्राली ने पहाटेपासून तर सकाळी 9 वाजेपर्यंत विकल्या जात आहे. सध्या रेतीची टी पी उपलब्ध नसल्याने ही चोरीनें आनलेली रेती महाग दराने विक्री करून लाखों रुपयांची कमाई केल्या जात आहे. 

        मागील पंधरा दिवसापूर्वी नांदा येथे अवैध रेती करणारा ट्रक जप्त केला होता. सदर हायवा ट्रक मालकाने नांदा फाटा परीसरात आपला व्यवसाय वाढवीला होता. यामुळे स्थानिक अवैध रेती व्यवसायिक यांना फटका बसत असल्याने येथील अवैध व्यवसायिक यांनीच माहिती देत सकाळी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई करण्यात लावल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे. (korpana)

        याउलट चोरीनें रेती विकण्याची सुट मिडवलेल्या काही विशेष स्थानिक अवैध व्यवसायिकांच्या स्वताच्या मालकीचे विना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर दिवसा-ढवळ्या परिसरतील नाल्याची व साठा करून ठेवलेल्या रेतीची अवैध वाहतूक करताना दिसून येत आहे. यावर मात्र अजून पर्यंत कारवाई होत नसल्याने अवैध रेती व्यवसायिक यांच्याशी स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सबंध जोपासल्याचे दिसून येत आहे. उपविभागीय पुलिस अधिकारी मुख्यालय असलेल्या नांदा येथे विना नंबर प्लेटच्या ट्रैक्टर मालकांविरुद्ध पोलिस कारवाई करून ट्रैक्टर का जब्त करीत नाही याचे ही नागरिकांना आश्चर्श वाटत आहे. परिसरातील सुज्ञ नागरिक आता, साहेब.. नांदा- गडचांदूर परिसरातील अवैध रेती वाहतुकीवर आळा कधी बसणार हो..? असे प्रश्न विचारत आहे. (aamcha vidarbha) (gadchandur)







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top