Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लोकनेते श्रद्धेय प्रभाकरराव मामुलकर जयंती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेकडो नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ ३१ रक्तदात्यांनी केले रक्तदान श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजन आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि...

शेकडो नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
३१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १८ डिसेंबर २०२३) - 
        श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे लोकनेते स्मृतिशेष प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी महाविद्यालयात भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात एकूण ३१ रक्तदात्यानी रक्तदान करून एक मानवीय कार्य पार पाडले, सोबतच रक्तदाब, डायबिटीस, रक्तगट, एचआयव्ही, हिमोग्लोबिन, सिकलसेल अश्या विविध तपासण्यासुद्धा केल्या गेल्या. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. (Loknete Shradheya Prabhakarrao Mamulkar Jayanti) (Shree Shivaji College Rajura)

        विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याबाबत सावध असले पाहिजे आणि एड्स सारख्या भयानक रोगाची चाचणी वेळोवेळी करून स्वतःचे आरोग्य जपले पाहिजे असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी रासेयो पथकाने रक्तदान शिबिरासोबतच आरोग्य तपासणी शिबिराचे सुद्धा आयोजन केलेले होते. या शिबिरात संग्रहित झालेले रक्त चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीला देण्यात आले, त्यातून अनेक गरजूंना रक्ताचा पुरवठा करता येईल. 

        दरवर्षी श्रद्धेय प्रभाकरराव मामुलकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथक रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते. यावर्षी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अन्य नागरिकांनी सुद्धा या शिबिरात रक्तदान केले. रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक गरजूं रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही आणि त्यामुळे अनेकांना रक्त न मिळाल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो, एकाही रुग्णाचा रक्ताच्या कमतरतेमुळे जीव जाता कामा नये ही बाब लक्षात घेऊन युवकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी व जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करण्याचे ठरविले, तसेच यासाठी राष्ट्रीय सेवा योजना पथक रक्तदानासाठी युवकांमध्ये जनजागृती मागील अनेक वर्षांपासून करत आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ.आर.आर. खेराणी, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते, या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की, डॉ सारिका साबळे तसेच सर्व राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम शेतले. (aamcha vidarbha) (rajura)






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top