Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शेतकरी संघटनेचे साखरी येथे रास्ता रोको आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ॲड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त तरुण उतरले रस्त्यावर आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १८ डिसेंबर २०२३) -          शेतकरी ...

ॲड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त तरुण उतरले रस्त्यावर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १८ डिसेंबर २०२३) - 
        शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, स्वतंत्र भारत पक्ष आणि युवा आघाडी यांच्या वतीने दिनांक १८ डिसेंबर २०२३ ला दुपारी राजुरा तालुक्यातील कोळसा प्रकल्प असलेल्या साखरी या गावाजवळ राजुरा - कवठाळा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो शेतकरी, प्रकल्पग्रस्त, महिला आणि तरुणांनी रस्ता रोखून वाहतूक बंद पाडली. अखेर वेकोली अधिकाऱ्यांनी दिनांक ५ जानेवारीला या सर्व प्रश्नाबाबत चर्चा करून मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. (Adv. Wamanrao Chatap)

        या आंदोलनाचे नेतृत्व जेष्ठ शेतकरी नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप, निळकंठ कोरांगे, पोर्णीमाताई निरंजने, शेषराव बोंडे, बाजार समिती संचालक प्रभाकर ढवस, दिलीप देठे, कपील इद्दे, बाबा कावळे, कवडू पोटे, हरिदास बोरकुटे, दत्तु ढोके,संजय करमरकर, रमेश नळे, नरेंद्र काकडे, दिलीप देरकर, हरिश्चंद्र आवारी, दत्ता हिंगाणे, साखरी सरपंच प्रणाली मडावी, पोवनी सरपंंच पांडूरंग पोटे, चार्ली सरपंच सुरेंद्र आवारी, गोयगाव सरपंच बंडू कोडापे, निमनी सरपंच अतुल धोटे, बाखर्डी सरपंच अरूण रागीट, चिंचोली उपसरपंच विजय मिलमिले, गणपतराव अडवे, गणेश रोगे, माजी नगरसेवक मधु चिंचोलकर, संतोष डोंगे, कवठाळा उपसरपंच निरंजन गौरकार, नानाजी पोटे यांचेसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शे.सं.च्या पदाधिका-यांनी केले.

        शेतकरी, बेरोजगार युवक व प्रकल्पग्रस्तांच्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, कंपनीने परिपत्रका प्रमाणे वेतन द्यावे, रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजविण्यात यावे, शेतीकडे जाणारे रस्ते खुले करण्यात यावे, शेतकऱ्यांना शेताचे नुकसान भरपाई व रोजगार दिल्या शिवाय वेकोलिने शेतात काम सुरू करू नये, साखरी गावातील घरांना ब्लास्टिंगमुळे तडे जाऊन घराचे नुकसान होत असल्यामुळे कमी तीव्रतेची ब्लास्टिंग करण्यात यावी, ग्रामपंचायत मधुन डिझेलसाठी परवानगी (एन.ओ.सी.) घेताना सब एरिया सोळंकी व हर्षा कंपनी ने गावातील ५० मुलांना कामावर घेणार म्हणुन हमी दिली होती, परंतु आज पर्यंत एकाही मुलांना रोजगार देण्यात आला नाही या सर्वांना रोजगार द्यावा, महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, ९ मार्च ला झालेल्या आंदोलनातील मागण्या त्वरीत पूर्ण करव्या, वेकोलिच्या कोळसा खाणीत कार्यरत हर्षा कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वेतनातील फरकाची रक्कम द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमीटेड चे अधिकारी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी आले आणि त्यांनी आंदोलक नेत्यांशी सविस्तर चर्चा करून ५ जानेवारीला मुख्य महाव्यवस्थापक कार्यालयात बैठक घेऊन सर्व मागण्या सोडविणार असल्याचे सांगितले. यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

        आंदोलनात मारोती लोहे, भास्कर लोहे,भास्कर जुनघरी, रामदास जिवतोडे,बबन पिदुरकर, नंदकुमार कावळे, मारोती पोटे, मनोज उरकुडे, किशोरभाई चौधरी, सिंधुताई लांडे, रमेश गौरकार, मारोती गव्हाणे, भाऊराव बोबडे, सुरज जिवतोडे, उत्पल गोरे, साईनाथ पिंपळशेंडे, समाधान लडके, रमेश बोंडे, मारोती सातपुते, आबाजी धोटे, बळीराम कुचनकर, मधुकर कुचनकर, महादेव ताजणे, अनिल डाखरे, रमेश बोबडे, रंगराव कुळसंगे, प्रभाकर लडके, रमेश रणदिवे, राजु पाटील, सचिन कुडे, राहुल बानकर, सुरज गव्हाणे, दिनकर डोहे, बळीराम खुजे, पुंडलिक ताजणे, भिवसन गायकवाड, पुंजाराम ठक, सुभाष जिवतोडे, सुधाकर पिंपळशेंडे, मधुकर लडके, मारोती पिंपळशेंडे, सुभाष काटवले, बाबुराव बोढाले, विनायक महाकुलकर, मनोज गोरे, जनार्धन झाडे, मारोती झाडे, स्वप्निल घोटे, शंकर थेरे, रामदास वंगणे, महादेव थेरे, परशुराम भोयर, सचिन डेरकर, बंडू बोबडे, सुरेंद्र गोरे, सुधाकर उरकुडे, विनोद पोटे, पांडूरंग गाडगे, भास्कर पोटे, विनायक कुचनकर, विनायक देवाळकर, वैभव कोरडे, पवन घाटे, ज्ञानेश्वर कौरासे, सुरज काकडे, जगदीश उरकुडे, सचिन मोहितकर, किसन जयपुरकर, मंगेश लांडे, शाम आत्राम, सुभाष तेलंग, संजय झुंगरे, महेश मडावी, विठोबा वांढरे, मयुरे, उमेश मरस्कोले, विनायक कटवले, समीर वाडगुरे, विकास हिंगाणे, संजय उमरे, शिवा पिंपळशेंडे, भास्कर राऊत, सुरेश वाढरे, प्रफुल कोलावार यांचेसह शेकडो नागरिक आणि मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या. (aamcha vidarbha) (rajura)






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top