Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: उपजिल्हा रुग्णालय वरोरा वरोरा येथे सिकलसेल सप्ताहाचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे वरोरा (दि. 16 डिसेंबर 2023) -         उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक सिकलसेल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. य...

आमचा विदर्भ - अनंता गोखरे
वरोरा (दि. 16 डिसेंबर 2023) -
        उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक सिकलसेल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मंच्यावर उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. विरुडकर, सा. अधिसेवीका वंदना विनोद बरडे उपस्थित होते. प्रास्ताविक कोल्हे यांनी केले. डॉ. विरूडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सिकलसेल आजाराची माहिती दिली. आजार कसा होतो, काय करायला पाहिजे इत्यादि विषयी माहिती दिली. वंदना विनोद बरडे यांनी उपाययोजना सांगितली. जीवनशैली बद्दल मार्गदर्शन केले. उदाहरणादाखल समजाऊन सांगितले. त्याचा प्रचार व प्रसार करण्यास सांगितलं. तसेच सिकलसेलग्रस्त रुग्णाचे मनोगत घेतले. शाळकरी मुलांसोबत चर्चा केली. मुलांनी, मुलींनी उत्स्पूर्त सहभाग नोंदविला. आभार पुनम यांनी केले. (aamcha vidarbha) (warora) (Sickle Cell Week)



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top