Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: तालुकास्तरावर प्रथमच होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेला सुधीर मुनगंटीवार यांनी भव्यता आणली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपुरातून घडतील भविष्यातील ऑलिम्पिकपटू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरचा डंका वाजत असल्याचा आनंद : ना.सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर...

चंद्रपुरातून घडतील भविष्यातील ऑलिम्पिकपटू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चंद्रपूरचा डंका वाजत असल्याचा आनंद : ना.सुधीर मुनगंटीवार
बल्लारपूर येथे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २८ डिसेंबर २०२३) -
        देशात कोणत्याही क्रीडा स्पर्धा तालुकास्तरावर होण्याचा हा पहिला प्रसंग आहे. परंतु राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आणि 67व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांना भव्यता प्राप्त झाली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी काढले. (Chief Minister Eknathji Shinde) (Inauguration of National School Sports Tournament at Ballarpur)

        बल्लारपूर येथील विसापूर तालुका क्रीडा संकुलात 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), वने व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. संजय बनसोडे, आमदार रामदास आंबटकर, अप्पर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चावरे, पद्मश्री बहादूरसिंह चव्हाण, क्रीडापटू हिमा दास, ललिता बाबर, बॅडमिंटनपटू मालविका बनसोड, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी महानगर अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे (Dr. Mangesh Gulwade), जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यावेळी उपस्थित होते. (Forest and Cultural Affairs and Guardian Minister Sudhir Mungantiwar)

        आपल्या संबोधनात मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे क्रीडा क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत. त्याचेच अनुकरण राज्य सरकार करीत आहे. कोणत्याही तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित होण्याचा हा पहिला प्रसंग आहे. या आयोजनला मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भव्यदिव्यता आणली. त्यामुळे चंद्रपुरातील भूमितून आगामी काळात ऑलिम्पिकपटू तयार झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. चांगल्या कामांबाबत मा. ना. सुधीर मुनगंटीवार नेहमीच आग्रही असतात, याचा आनंद वाटतो, असेही गौरवोद्गार त्यांनी काढले. 

        उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या भाषणादरम्यान राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले. चंद्रपूर जिल्हा हा वाघ आणि साग साठी प्रसिद्ध आहे. या दोन्हीवर कोणत्याही प्रतिकूल वातावरणाचा परिणाम होत नाही. चंद्रपुरातील खेळाडूही तसेच कणखर आहेत. भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू ओलंपिक खेळण्यासाठी नक्कीच यशस्वी होतील अश्या शुभेच्छाही दिल्या.

        क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. संजयजी बनसोडे यांनीही आपल्या भाषणात मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांबद्दल सुरुवातीपासून आग्रही होते असे सांगितले. स्पर्धेचे आयोजन, सूक्ष्म नियोजन सुधीरभाऊंनी स्वत: पुढाकार घेत केले. सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यही त्यांच्यामुळे वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने व आता क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने आपल्याला मा. ना. मुनगंटीवार किती सूक्ष्म नियोजन करतात हे बघायला मिळाले, असेही बनसोडे म्हणाले. 

चंद्रपूरचा डंका वाजत असल्याचा आनंद : ना.सुधीर मुनगंटीवार
        ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशातील सर्वाधिक वाघ चंद्रपुरात आहेत.अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दरवाज्याला वापरलेले सागवान लाकूडही चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. क्षेत्र कोणतेही असो चंद्रपूरचे नाव येतेच. त्यामुळे आगामी काळात ऑलम्पिक मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे नावलौकिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपुरात ‘मिनी भारत’चे दर्शन घडत आहे. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाचेही मा. ना. मुनगंटीवार यांनी कौतुक केले. देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात 2036 मध्ये होणाऱ्या ओलिम्पिक स्पर्धेत देशातील कोहिनुररूपी खेळाडू सर्वाधिक पदके प्राप्त करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
        स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर भव्यदिव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाने मान्यवर व उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. गायिका शाल्मली खोलगडे यांच्या ‘लाइव्ह परफॉर्मन्सने’ रंगत आणली. फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्स मुख्य आकर्षण ठरले.

अभूतपूर्व सोहळा
        एक शाम खिलाडियो के नाम, शिववंदना, गणेश वंदन, महाराष्ट्राची लोकधारा, कलर्स ऑफ इंडिया आदी कार्यक्रमांच्या आयोजनाने स्पर्धा अभूतपूर्व ठरणार आहे. स्पर्धेचे प्रसिद्ध ‘थीम सॉंग’ ‘आओ चंद्रपूर खेलो चंद्रपूर’ला प्रसिद्ध पार्श्वगायक कैलास खेर यांचा आवाज आहे. प्रसिद्ध अभिनेते सलमान खान, आमिर खान यांनीही सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

खेळाडूंचा फ्लॅगमार्च 
        राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी बल्लारपूर येथे दाखल झालेल्या सर्व राज्यातील खेळाडूंनी शिस्तबद्ध पध्दतीने फ्लॅगमार्च करीत आपापल्या राज्याचे दर्शन घडविले. या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून जवळपास 1 हजार 600 खेळाडू चंद्रपुरात दाखल झाले आहेत.

गॅझेटिअर व ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’चे प्रकाशन
        राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्याचे ‘गॅझेटिअर’ मराठी भाषेत प्रकाशित करण्यात आले. या ‘गॅझेटिअरचे’ तसेच येथे आलेल्या खेळाडूंना चंद्रपूर जिल्ह्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाची माहिती व्हावी, या उद्देशाने हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेल्या ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, क्रीडामंत्री श्री. संजयजी बनसोडे आणि पालकमंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. (aamcha vidarbha) ballarpur) (chandrapur)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top