Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वेगळ्या विदर्भ राज्यासाठी गडचांदूर व कोरपना येथे रास्ता रोको आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ॲड. वामनराव चटप यांच्या नागपुर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला समर्थन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. २८ डिस...

ॲड. वामनराव चटप यांच्या नागपुर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला समर्थन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २८ डिसेंबर २०२३) -
        विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष तालुका कोरपण्याच्या वतीने  गडचांदूर येथील माणिकगड चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर येथील संविधान चौकात 27 डिसेंबर पासुन विदर्भवादी नेते माजी आमदार वामनराव चटप यांचे आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला समर्थन देण्याकरिता गडचांदूर येथे रास्ता रोको करण्यात आले. 

      यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी सभापती नीलकंठ कोरांगे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नवले, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष ॲड. श्रीनिवास मुसळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बावणे, माजी सभापती रवी गोखरे, माजी सरपंच नरेश सातपुते, माजी उपसरपंच मोरेश्वर आस्वले, उपसरपंच अनिल कवरासे, रत्नाकर चटप गडचांदूर, शहर अध्यक्ष पटकोटवार, मुमताज अली, माजी सरपंच सचिन बोंडे, शिवाजी बोडे, खाजाभाई, कालिदास उरकुडे, बंडु राजुरकर, कैलास कोरांगे, सुनील आमने यांचे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन स्थळी गडचांदूर चे ठाणेदार रवींद्र शिंदे, उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त उपस्थित होता. (Adv. Wamanrao Chatap)

कोरपणा येथे ही रास्ता रोको आंदोलन
        स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 27 डिसेंबर पासून संविधान चौक नागपूर येथे ॲड. वामनराव चटप यांचे आमरण उपोषण सुरू आहे. विदर्भाची मागणी जोर धरत असताना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने कोरपणा येथील बस स्थानक चौकात आज शेकडो कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष सुनील बावणे, अविनाश मुसळे सह मोठ्या संख्येत शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (aamcha vidarbha) (gadchandur) (korpana) (vidarbha rajya aandolan)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top