Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी वरुड रोड येथे चक्काजाम आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी विरूर स्टेशन (दि. २८ डिसेंबर २०२३) -         स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी तीव्र करण्याकरिता नागपूर...

आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी
विरूर स्टेशन (दि. २८ डिसेंबर २०२३) -
        स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी तीव्र करण्याकरिता नागपूर येथील संविधान चौक येथे 27 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू असून विदर्भवाद्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शेतकरी संघटना, महिला आघाडी, स्वतंत्र भारत पक्ष युवा आघाडी ने 28 डिसेंबरला हैदराबाद राज्य महामार्गावरील राजुरा तालुक्यातील वरुर रोड येथे रास्ता रोको चक्काजाम आंदोलन केले. शेतीची नाळ जोडून असली तर माणूस म्हणून नेहमीच शेतकऱ्याप्रती भाऊक होतो. देशाला शेती शिवाय पर्याय नाही माझी काळी माती,माझा शेतकरी वाचला पाहिजे शेतकऱ्याचे शोषण थांबवून शेतकरी प्रगतशील झाला पाहिजे हेच आमचे ध्येय असे म्हणणारे शेतकऱ्यांचे कैवारी कट्टर विदर्भवादी नेते माजी आमदार वामनराव चटप (adv. Wamanrao Chatap), देशोन्नती चे संपादक प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांच्यासह शेकडो विदर्भवादी संविधान चौक नागपूर येथे आमरण उपोषण सुरू असून स्वतंत्र विदर्भाची मागणी तीव्र करण्याकरिता उपोषण करणाऱ्या विदर्भवाद्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी 28 डिसेंबरला हैदराबाद राज्य महामार्गावरील विदर्भाच्या विविध मागण्यासह हजारोच्या संख्येने वरुर रोड येथे एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सोंडोपासून तर वरुर,टेंबुरवाही पासून वरुर पर्यंतवाहनाच्या रांगा लागल्या होत्या, राजुरा पोलीस व विरूर पोलिसांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली सदर आंदोलन शांतपणे पार पाडण्यात आले, आंदोकर्त्यांना मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत कलम ६८,७९ प्रमाणे कारवाई करण्यात आली. यावेळी शेषराव बोंडे,प्रभाकर ढवस, दिलीप देठे, आबाजी धानोरकर,प्रफुल कावळे, कपिल इदे,भास्कर सिडाम, मधुकर चिंचोलकर, विनायक महाकुलकर, भास्कर वांढरे, बळीराम खुजे, भिवंसन गायकवाड, मीननाथ परशुटकर विलास बोबडे, घनश्याम पिंपळशेंडे, नरेश गुरनुले, सुरज गव्हाणे, देविदास पडोळे, सुधाकर अमृतकर यासह हजारोच्या संख्येने युवक, महिला, नागरिक सहभागी झाले होते. (wirur station) (aamcha vidarbha) (swatantra vidarbha rajya)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top