Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: २५ दिवस उलटूनही अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
४ डिसेंबर पासून सुरू राज्यव्यापी बेमुदत संप अंगणवाडी महिलांच्या ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुक...

४ डिसेंबर पासून सुरू राज्यव्यापी बेमुदत संप
अंगणवाडी महिलांच्या ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. २८ डिसेंबर २०२३) -
        कोरपना तालुका येथील आंगणेवाडी महिला कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबर पासून आपल्या मागण्यासाठी कोरपना तहसील समोर ठिया आंदोलन सुरू केले आहे. आपल्या मागण्याचे निवेदन गटविकास अधिकारी, कोरपना मार्फत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मुबंईला दिले आहे. आंगणेवाडी महिला कर्मचाऱ्यांची मागण्याचे सुहानुभूतीपुर्वक विचार करुन सोडवणुक करावी ही विनंती करत कोरपना तहसील समोर आंदोलन करीत आहे. (Administration's neglect of burning issues of Anganwadi women)

        अंगणवाडी महिलांच्या ज्वलंत प्रश्नांला घेउन ४ डिसेंबर पासून आंगणेवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र ने  राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. राज्यांतील दोन लाख अंगणवाडी महिला कर्मचारी सहभागी झाल्या आहे. आंगणेवाडी महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणित सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया नुसार अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, तो पर्यंत २६ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, राज्यविधी मंडळाने दिलेल्या आश्वासना नुसार अंगणवाडी महिलांना मानधनाचे निम्मे पेंशन देण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया नुसार अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी लागू करण्यात यावी आणि अंगणवाडी मदतनिसांना सेविकेच्या मानधनाच्या अंशी प्रतिशत मानधन देण्यात यावे ह्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करीत आहे. (aanganwadi madatnis)

        या वेळी गुजाबाई टोंगें, विमल जेणेकर, शोभा काकडे, कल्पना मांदाडे मंजूषा मालेकार, लता अहिरकर, माधुरी भंडारकर, मंगला वाघाडे, सुषमा खिरटकर, निर्मला गिरडकर सहीत शेकडो आंगणेवाडी सेविका आणि मदतनिस उपास्थित होत्या. कोरपणा तालुक्यातील 184 अंगणवाडी केंद्राचे कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाले आहे. (korpana) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top