Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: हिरापूर येथे आरोग्य शिबिर संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
१०४ ग्रामस्थांनी घेतला शिबिराचा लाभ आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. २८ डिसेंबर २०२३) -         ग्राम पंचायत ह...

१०४ ग्रामस्थांनी घेतला शिबिराचा लाभ
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २८ डिसेंबर २०२३) -
        ग्राम पंचायत हिरापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदा व अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २७ डिसेंबर ला हिरापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आरोग्य शिबिर संपन्न झाले. (Ultratech Cement Limited, Awarpur)

        आरोग्य शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाघमारे गुरुजी यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरापूर ग्रामपंचायत चे उपसरपंच अरुण काळे, तर विशेष अतिथी म्हणून ग्रामपंचायत माजी सरपंच तथा सदस्य प्रमोदजी कोडापे, ग्रा. पं. सदस्य दुर्योधन सिडाम, डॉ. संकेत शेंडे, डॉ. दांडेकर मँडम, अल्ट्राटेकचे सी.एस.आर. प्रमुख प्रतीक वानखेडे, आरोग्य सेवक राठोड, आरोग्य सेविका झाडे मँडम, माजी तंटामुक्त अध्यक्ष विशाल पावडे, सौ. मोरे, ममता खेलूरकर, आशा सेविका सौ. उषा वाघमारे, संगीता वानखेडे, संगीता तोडसाम, देविदास मांदाळे, ग्रामपंचायत पेसा मोबिलायझर सुवर्णा सिडाम, ग्रामपंचायत कर्मचारी प्रतीक लेडांगे आदी उपस्थित होते. (gram panchayat hirapur) हिरापूर ग्रामस्थांनी बहुसंख्येने या आरोग्य  शिबिरात तपासणी करत १०४ ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. (gadchandur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top