Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अफरोज शेख नेपाळमध्ये फुटबॉल खेळणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल विद्यार्थी अफरोज शेख चे सुयश विदेशात खेळण्यासाठी निवडीबद्दल होत आहे सर्वत्र अभिनंदन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखाव...

आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल विद्यार्थी अफरोज शेख चे सुयश
विदेशात खेळण्यासाठी निवडीबद्दल होत आहे सर्वत्र अभिनंदन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २८ डिसेंबर २०२३) -
        कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी येथील आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवारपूर येथील इयत्ता बारावीचा विद्यार्थी अफरोज रहीम शेख या तरुणाची नेपाळमधील पोखारा येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. (Ultratech Cement Company) (National Football Championship)

        आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवारपूरचा विद्यार्थी बिबी येथील रहिवासी आहे. युवा फुटबॉल स्पोर्टिंग असोसिएशन, वणी या संघाकडून तो खेळणार असून नेपाळला जाण्यासाठी आज (दि. २८ ला) रवाना झाला आहे. हैद्राबाद येथे झालेल्या फुटबॉल स्पर्धेत त्याने आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. विदेशात खेळण्यासाठी त्याच्या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. (gadchandur) (aamcha vidarbha) (Aditya Birla Public School)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top