Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: १७ रुग्णांचे मोतियाबिंदू क्लिष्ट आपरेशन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सामाजिक कार्यकर्त्या वंदना विनोद बरडे यांच्या पुढाकार आमचा विदर्भ - दीपक शर्मा वरोरा (दि. २८ डिसेंबर २०२३) -         सामाजिक कार्यकर्त्या तथ...

सामाजिक कार्यकर्त्या वंदना विनोद बरडे यांच्या पुढाकार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
वरोरा (दि. २८ डिसेंबर २०२३) -
        सामाजिक कार्यकर्त्या तथा उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे कार्यरत सौ. वंदना विनोद बरडे यांच्या विशेष प्रयत्नाने सांतरगांव येथील गरीब मजदुर जवळपास १७ स्त्री व पुरुषांचे डोळ्यांचे क्लिष्ट आपरेशन सुसज्ज अश्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले. (Cataract operation) सदर ऑपरेशन माजी खासदार तथा पद्मश्री डॉ. महात्मे (Dr. Mahatme) यांच्या नागपूर येथील रुग्णालयात करण्यात आले. यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तथा उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील सह अधिसेविका सौ. वंदना विनोद बरडे व सामाजिक कार्यकर्ते विनोद बरडे यांच्या प्रयत्नाने करण्यात आले. जे आपरेशन बाकी ठिकाणी टाळले जाते अश्या रुग्णांना वंदना बरडे व विनोद बरडे हे सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा देतात. बरडे दाम्पत्यांच्या या प्रयत्नाने आतापर्यंत ५० ऑपरेशन ला आपले योगदान दिले आहे. (warora ) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top