Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते सेवा केंद्राच्या दिनदर्शिका-२०२४ चे प्रकाशन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २८ डिसेंबर २०२३) -         स्थानिक ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या सेवाकार्यावर आधारीत दिनदर...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २८ डिसेंबर २०२३) -
        स्थानिक ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या सेवाकार्यावर आधारीत दिनदर्शिका-२०२४ चे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे 
(Chief Minister of the State Hon. Eknathrao Shinde) यांच्या शुभहस्ते चंद्रपूरातील वनविश्रामगृहात पार पडले. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस (Deputy Chief Minister No. Devendra Fadnavis), राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार (Minister of Forests, Cultural Affairs and Fisheries and District Guardian Minister No. Sudhir Bhau Mungantiwar) तसेच राज्याचे क्रिडा मंत्री ना. संजय बनसोडे (State Sports Minister No. Sanjay Bansode) यांचीही त्यांसमवेत उपस्थिती होती.

        राजुरा शहरात मागील ऑगस्ट महिन्यामध्ये स्थापन झाल्यापासून सेवा केंद्राच्या अव्याहत सेवा कार्याचा धावता आढावा या दिनदर्शिकेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस असून ही दिनदर्शिका संपुर्ण राजुरा विधानसभा क्षेत्रात निःशुल्क वितरीत करण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी विधानसभा निवडणुक प्रमुख तथा माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे (Devrao Bhongle) यांनी उपस्थितांना दिली. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top