Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: साखरवाही येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - राहुल पडवेकर साखरवाही (दि. १ जानेवारी २०२४) -         सिद्धार्थ वाचनालय बुद्ध विहार साखरवाही व शेतकरी महिला बचत गट साखरवाही या...

आमचा विदर्भ - राहुल पडवेकर
साखरवाही (दि. १ जानेवारी २०२४) -
        सिद्धार्थ वाचनालय बुद्ध विहार साखरवाही व शेतकरी महिला बचत गट साखरवाही यांच्या संयुक्त विद्यमाने साखरवाही येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९७व्या जयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. ३ जानेवारी ला बुद्ध विहार जवळ सकाळी ९ वाजता झेंडावंदन नंतर ९.३० वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ८ वाजता गाणे निळ्या नभाचे या सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उदघाटन बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ता राहुल आमटे, साखरवाही येथील सरपंच सौ. वर्षा बोरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राजू झोडे, उलगुलान संस्था बल्लारपूर, सिद्धेश्वर जंपलवार, व्यवस्थापक अंबुजा सिमेंट, उपसरपंच भास्कर वनकर, पोलीस पाटील हरिदास पहानपटे, तंटामुक्त अध्यक्ष गजानन विधाते, ग्रापं सदस्य सौ. आम्रपाली वानखेडे, ग्रापं सदस्य सौ. सुनंदा नळे, ग्रापं सदस्य बाळू टेकाम, ग्रापं सदस्य सौ. माधुरी जुलमे, गोपाल जांभुळकर, अंबुजा सिमेंट, रुपेश गेडेकर अंबुजा सिमेंट, ग्रामसेवक धुर्वे, जिप शाळा मुख्याध्यापक रवी सोयाम, कृषी सहायक अधिकारी परमेश्वर खिल्लारे, आनंद कृषी केंद्राचे संचालक राहुल पडवेकर, डॉ. पुरुषोत्तम परसूटकर, आशा वर्कर सौ. मनीषा नळे, अंबुजा फाउंडेशन सौ. मेघा गेडाम, अंगणवाडी सेविका सौ. मंगला गौरकार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. 

        सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष-संगीता जगताप, सचिव-कल्पना कोल्हे, कोषाध्यक्ष-नीलम वानखेडे, शांताबाई वाघमारे, कविता वाघमारे, संध्याताई पडवेकर, माधुरी जगताप, सपना मडावी, वंदना नगराळे, पुष्पा पडवेकर, कमलाबाई बच्चलवार, मंगला लोखंडे, यशोधरा वानखेडे, अभय जगताप, सुरज नगराळे, लालू करमनकर, विकास वानखेडे, प्रफुल वानखेडे, मोगरेज नगराळे, अंकित पडवेकर, कुणाल लोखंडे, हर्षल कोल्हे, राजू वानखेडे, संघपाल वाघमारे, लालू वनकर, अश्विन वानखेडे, सुप्रबुध्द वाघमारे, धीरज लोखंडे, अरविंद लोखंडे, प्रणय लोखंडे, उल्हास बच्चलवार व गावकऱ्यांनी केले आहे. (aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top