Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: हाणामारीत जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स बल्लारपूर (दि. ६ नोव्हेंबर २०२३) -         4 ऑक्टोबर रोजी क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात जखमी झालेल्या प...

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
बल्लारपूर (दि. ६ नोव्हेंबर २०२३) -
        4 ऑक्टोबर रोजी क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा तब्बल महिनाभरानंतर नागपूर येथील खासगी रुग्णालयात 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजताच्या मृत्यू झाला.

        प्राप्त माहितीनुसार, स्थानिक दादाभाई नौरोजी वॉर्डात राहणारे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक देविदास चौधरी यांचा मुलगा चेतन वय 29 वर्ष हा बामणी येथील बामणी प्रोटीन्स लिमिटेड कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता सामान्य शिफ्टमध्ये त्याचा सहकारी शुभम सुरेश परबांदे यानी क्षुल्लक कारणावरून भांडण करीत मयत चेतन चौधरी याला कंपनीतच मारहाण करण्यात केली.

        आरोपी शुभमने चेतनच्या जबड्यावर आणि कानाच्या खाली हाताने वार केले, यात चेतन गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याच्या जबड्याचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर अंतर्गत आघातामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांला नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चेतनवर नागपुरातही ऑपरेशन करण्यात आले पण चेतनचा 3 नोव्हेंबर ला पहाटे मृत्यू झाला.

        शुक्रवारी नागपुरात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह दादाभाई नौरोजी वार्डातील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले, त्यानंतर मृत चेतन चौधरी यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर मयत चेतन चौधरी यांच्या अहवालावरून आरोपी शुभम परबांदे याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले तेथून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

        मात्र चेतनच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी आता आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रासकर करीत आहे. (aamcha vidarbha) (crime) (ballarpur)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top