Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: प्रतिकच्या निष्काशनावर भाजपा जिल्हाध्यक्षांचे शिक्का मोर्तब
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. ०८ नोव्हेंबर २०२३) -         भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी स...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ०८ नोव्हेंबर २०२३) -
        भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस तथा गडचांदूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी अरविंद डोहे, यांना दारूचे सेवन करून शिवीगाळ करत अपमानित केल्याचे आरोप त्यांचे पती भाजपा नगरसेवक अरविंद डोहे (Arvind Dohe) यांनी केले होते. या प्रकरणी कोरपना भाजपा तालुकाध्यक्ष 'नारायण हिवरकर' यांनी 21 आक्टोबर रोजी गडचांदूर येथील भाजपा कार्यकर्ता 'प्रतिक' ला पक्षातून निष्कासित केले होते. मात्र तालुका अध्यक्षांच्या या कारवाईवर भाजपातीलच काही नेत्यांनी प्रश्न उभे करत सदर कारवाई वैध की अवैध असा प्रश्न निर्माण केला होता. मात्र आता भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा (BJP district president Harish Sharma) यांनी सुद्धा भाजपा पक्षातील महिलेच्या सन्मानाचा पावित्रा घेत एका पत्राद्वारे 'प्रतीक सदनपवार' ला पक्षातून निलंबित केल्याचे पत्र दिल्याने आता प्रतिकच्या निष्काशनावर भाजपा जिल्हाध्यक्षांचे शिक्कामोर्तब झाले आहे. 
 
        भाजपा पक्ष हा महिलांचा आदर व सन्मान करणारा पक्ष आहे. जर भाजपा पक्षातीलच कार्यकर्ते पक्षाच्या संस्कृती विरूद्ध वागत असल्याने पक्षातील महिला सोबतच पक्षाचीसुद्धा प्रतिमा सुद्धा मलीन होते. अश्या व्यक्तीची पक्षातून हकालपट्टी करून पक्षश्रेष्ठींनी एका अर्थाने महिलांना सन्मान व न्याय दिला आहे.
- अरविंद डोहे, भाजपा नगरसेवक, गडचांदूर

        एका कार्यकर्त्याला पक्षातून काढायला आता थेट जिल्हाध्यक्षच शिक्का मोर्तब करत आहे हे नवलच आहे. पैशाचे प्रकरण हे आमचे व्यक्तिगत असून त्याला अरुणभाऊंनी भाजपचा विषय बनवून चुकीचा संदेश समाजमनात पाहचविला. मी महिलेचा सन्मान केला नाही हेही चुकीचे असून माझ्या आईशी अवर्तणूक करण्यात आली तेव्हा महिलेचा सन्मान नव्हता का. (gadchandur) (aamcha vidarbha)
- प्रतीक सदनपवार

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top