Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विविध सामाजिक उपक्रमाने हंसराज अहिर यांचा वाढदिवस साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण, नगर परिषद सफाई कामगार, वेकोली कामगार यांना ब्लॅंकेट, मिठाई व फळ वाटप भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे व ...

राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण, नगर परिषद सफाई कामगार, वेकोली कामगार यांना ब्लॅंकेट, मिठाई व फळ वाटप
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे व भाजपा तालुका महामंत्री अँड.इंजि. प्रशांत घरोटे यांचा पुढाकार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ११ नोव्हेंबर २०२३) -
        राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राजुरा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील रुग्णांना फळ आणि ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. तसेच माजी आमदार अँड. संजय धोटे (Adv. Sanjay Dhote) यांच्या जनसंपर्क कार्यालयात नगर परिषद येथील सफाई कामगारांना ब्लॅंकेट व मिठाई चे वाटप करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अरुण मस्की,जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, सौ रेखा देशपांडे, भाजपा तालुका महामंत्री अँड.इंजि. प्रशांत घरोटे, दिलीप वांढरे, कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो सचिन डोहे, माजी नगरसेवक राधेश्याम अडाणीया, सरपंच बाळनाथ वडस्कर, वामन तुराणकर, सुरेश रागीट, जनार्धन निकोडे, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी, संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य रवी गायकवाड, दिलीप गिरसावळे, रवि बुरडकर, नितीन बांभ्रटकर, प्रदीप बोबडे, मंगेश श्रीराम, पराग दातारकर, संजय जयपूरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. (Former Union Minister of State for Home Hansraj Ahir, Chairman of the National Commission for Backward Classes)

        धोपटाळा येथील भारतीय मजदूर संघ कार्यालयात अँड.इंजि. प्रशांत घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मजूर बांधवाना ब्लेंकेट वाटप करण्यात आले. यावेळी अनिल निब्रड, जिल्हा महामंत्री,भा.म.सं., अरुण मस्की, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, नैना परचाके, माजी पं.स.सदस्या, धोपटाळा ग्राम पंचायत सदस्य अल्का आत्राम, दीपा बोंतला, रावला रामस्वामी, श्रीनिवास कोपुला, सदस्य, वेकोली क्षेत्रीय कल्याण समिती,जनार्धन नीकोडे आदींची उपस्थिती होती. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top