Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रदूषण नियंत्रण मंडळ अल्ट्राटेक सीमेंट कंपनीवर मेहरबान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अखिल भारतीय सरपंच परिषद संघटना करणार कंपनी विरोधात धरणे व बेमुदत साखळी उपोषण प्रदूषण विषयक समस्येने नागरिक त्रस्त स्थानीय नागरिकांना विविध र...

अखिल भारतीय सरपंच परिषद संघटना करणार कंपनी विरोधात धरणे व बेमुदत साखळी उपोषण
प्रदूषण विषयक समस्येने नागरिक त्रस्त
स्थानीय नागरिकांना विविध रोगाची लागण
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदुर (दि. १२ नोव्हेंबर २०२३) -
        कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपुर अंतर्गत येत असलेल्या दत्तक गावातील 10 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच सदस्य  कंपनी विरोधात 13 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण सुरू करनार आहे. कंपनीच्या सी एस आर निधी मधून ग्रामपंचायतींना पाहिजे त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचा फटका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. सोबतच ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेता निधी परस्पर खर्च केला जात आहे. कंत्राटी कामगारांचया बोनसमध्ये वाढ करावी, स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा, कंपनीने माणिकगड येथे होणारी लाईम स्टोनची वाहतूक तात्काळ थांबवावी, आय टी आय  विद्यार्थ्यांना अप्रेंटिस करता जागा भरती करावी, गाव शिवारातील पांदन रस्त्याची दुरुस्ती कंपनीमार्फत करण्यात यावी, इतर राज्यातील शिक्षित युवकांना आणून कारखान्याच्या माध्यमातून प्रशिक्षित केल्याने दत्तक घेतलेल्या गावांमध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन कामावर घेण्यात यावे अश्या अनेक मागण्या साठी कंपनी विरोधात धरणे व बेमुदत साखळी उपोषण करण्याचे ठरवले आहे. 

        दिवसेंदिवस सीमेंट कारखान्याच्या माध्यमातून वाढत्या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या परिसरातील दत्तक गावामध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांना कॅन्सर, अपेंडिक्स, हर्निया, त्वचेचे रोग असे विविध आजार होत असताना दिसत असून अनेकांनी यामध्ये आपले जीव सुद्धा गमावलेले आहे. कंपनीच्या प्रदूषणामुळे रोग वाढत असल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे. यावरती कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या जात नाही आहे. मात्र परिसरातील नागरिकांच्या जीवनाशी कंपनी खेळ करीत आहे. कंपनी प्रशासन ने ही समस्या त्वरित निकाली काढावी. सी एस आर फंड च्या नावाखाली कंपनी इतर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठानंना व अधिकारी लोकांना यातील फंडाचा हिस्सा वाटप करतानाचे चित्रसुद्धा दिसून येत आहे ते त्वरित बंद करावे इत्यादी मागण्यासाठी सरपंच संघटना आक्रमक पवित्र घेत असून दत्तक गावातील नांदा, बीबी, अवारपूर, हिरापूर, सांगोडा, नोकारी, पालगाव, तळोदी, बाखर्डी, भोयेगाव गावातील सरपंच, उसरपंच सदस्य अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून सदर आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला दत्तक गावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय सरपंच परिषदेत तालुका कोरपना यांनी केले आहे. दत्तक गावातील महिला, विद्यार्थी, युवक तथा शेतकरी सहभागी होणार. सदर आंदोलनात दत्तक गावातील महिला, युवक तसेच शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे अखिल भारतीय सरपंच परिषदेने सांगितले. (aamcha vidarbha) (gadchandur)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top