Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या वाघिणीला पकडण्यात वनविभागाला मिळाले यश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ब्रम्हपुरी वनविभागाच्या अवलगावात पकडले आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. 05 नोव्हेंबर 2023) -         ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण ब्...

ब्रम्हपुरी वनविभागाच्या अवलगावात पकडले
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 05 नोव्हेंबर 2023) -
        ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रातील आवळगाव उपविभागातील कक्ष क्रमांक 1168 हल्दा बिटमध्ये दोन ते अडीच वर्ष वयाची वाघीण आज सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान पकडण्यात वनविभागाला यश मिळाले. (Caught in Avalgaon of Bramhapuri Forest Department)

        गेल्या आठवड्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात तिघांना जीव गमवावा लागला होता. पळसगाव वन परिक्षेत्रातील बेलारा येथे मेंढपाळाचा वाघाने बळी घेतलाहोता नंतर खडसांगी वन परिक्षेत्रात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पुन्हा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील आवळगाव उपविभागात वाघाचा हल्ला हळदा गावातील सयत्राबाई नामदेव कामडी (70) या महिलेचा बुधवारी हळदा बिट येथील कम्पार्टमेंट क्रमांक 1168 मध्ये शेतात काम करत असताना त्यांना वाघाने ठार केले. (Forest Department)

        ब्रह्मपुरी वनविभागाचे वन कर्मचारी या वाघिणीला पकडण्यासाठी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान सदर वाघिणीच्या स्थळाची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा एन. टायगर पी. चंद्रपूर डॉ.आर.एस. खोब्रागडे, आरआरटी ​​प्रमुख ए.सी. मराठे, पोलीस नाईक, (शूटर) ता.ए.वाय.प्र. चंद्रपूर,. राकेश आहुजा जीवशास्त्रज्ञ, वनविभाग, ब्रम्हपुरी, यांच्या पथकाने वाघिणीला ट्रेंकुलाइज करून पकडले नंतर टी.टी.सी चंद्रपूर येथे नेण्यात आले.

        ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा.) दक्षिण ब्रह्मपुरी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरआ टी सदस्य दिपेश टेंभुर्णे, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल वाटगुरे, ए.डी. कोरपे, वाहनचालक ए.एम. दांडेकर, आर.आर.टी. वाहनचालक उपस्थित होते. (aamcha vidarbha) (chandrapur) (Brahmapuri)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top