Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पालकमंत्री साहेब जिल्ह्यात चाललंय तरी काय?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वरुर रोड येथील क्लब चक्क राज्य प्रधान सचिवाचा आदेशाने पुनःश्च सुरु मनोरंजन क्लब मुळे लोकांचा मनात राग - आदित्य भाके आमचा विदर्भ - दीपक शर्मा...
वरुर रोड येथील क्लब चक्क राज्य प्रधान सचिवाचा आदेशाने पुनःश्च सुरु
मनोरंजन क्लब मुळे लोकांचा मनात राग - आदित्य भाके
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ५ ऑक्टॉबर २०२३) -
        शेतकरी, शेतमजूर व शेवटच्या घटकाला न्याय मिळावा म्हणून सत्तेत भागीदारी स्वीकारली असून आता आम्ही सत्तेत राहून सर्वसामान्यांची प्रश्ने मिटवू असे सत्ता स्थापनेच्या वेळेस आपण सर्वानी ऐकले असेलच, राजकारणी हे शेतकरी, शेतमजूर व शेवटच्या घटकाला काय न्याय देत आहे ते तर शोधचा विषय आहे मात्र सुशासनाच्या नावाने सत्तेत भागीदारी असलेल्या भाजप व जिल्ह्यात कर्तव्यदक्ष पालकमंत्री असताना त्यांच्या नाकाखाली वरुर रोड येथील बंद पडलेल्या मनोरंजन क्लब ला चक्क राज्याचे प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडून आदेश क्रमांक पोपोई 1222 प्र.क्र.169/विशा-5 दि. 23.06.2023 अन्वये आदेश पारीत करण्यात आलेले आहे. सदर आदेशान्वये जिल्हाधिकारी यांचे  कार्यालयाचे आदेश दि. 11.10.2022 रद्द करुन परवाना प्राधिकारी यांनी सदर आस्थापनेस कार्ड रुम/कार्ड क्लब परवाना देण्याबाबत नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केलेले आहे. (The club at Warur Road has been re-opened by the order of the State Chief Secretary)

        पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांनी सादर केलेला अहवाल व परवानाधारक यांनी त्यांचे सादर केलेले लेखी म्हणने यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारीत करण्यात आलेल्या आदेशाचे अनुषंगाने परवानाधारक यांनी केलेल्या अपील प्रकरणी प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पारीत आदेश क्रमांक: पीपीई 1222/ प्र.क्र.169/विशा-5 दि. 23.06.2023 मधील सुचनेनुसार परवानाधारक यांचे मौजा वरुर रोड ता. राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील कार्ड रुम/कार्ड मलय परवाना क्र. GB/D-VIII/T-2/2019/3 दि. 09.11.2019 हा परवाना पुनर्जिवीत करुन सदर परवान्याचे सन 2023 चे नूतनीकरण करण्यास मान्यता प्रदान केली आहे. (Anger in the hearts of people because of entertainment clubs - Aditya Bhake)

        सदर मनोरंजन क्लब पुनःश्च सुरु झाल्याने गावातील नागरिकांत विशेषतः महिलांमध्ये रोष दिसून येत आहे. याबाबतची तक्रार गावकऱ्यांनी राजुरा येथील मनसे चे आदित्य भाके (Aditya Bhake) व काहींनी आम आदमी पार्टीचे सुरज ठाकरे (Suraj Thackeray) याना दिली. त्याबाबत दोन्ही नेते क्लब बंद करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करीत आहे. आदित्य भाके यांनी याबाबतचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), जिल्हाधिकारी चंद्रपूर (Collector Chandrapur), पोलीस अधीक्षक चंद्रपूर (Superintendent of Police Chandrapur), पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. आदित्य भाके यांनी सहपात्रात वृत्तपत्रात प्रकाशित बातम्या, शाळेच्या मुख्याध्यपकांचे तक्रारपत्र, धार्मिक स्थळांच्या प्रमुखांचे तक्रारपत्र, जिल्हा काँग्रेसचे महासचिवाचे पत्र, स्थानिक गावकऱ्यांच्या स्वाक्षरीनिशी केलेल्या तक्रारीची प्रत, क्लब संचालक यांच्या विरोधात पोलिसांनी मागील वर्षी केलेल्या कार्रवाहीची प्रत सहपत्रात जोडली आहे. मात्र क्लब सुरु करण्याचे आदेशच चक्क प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे असल्याने क्लब संचालकाची पोच कुठपर्यंत असेल यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. (Principal Secretary (Appeals & Security) Home Department, Mantralaya, Mumbai in the matter of appeal filed by the licensee in pursuance of the order passed by the Collector's office.)

मनोरंजन क्लब असतंय तरी काय असा साधारणतः प्रश्न सर्वसामान्यांना असतो मनोरंजन क्लब साठी काय असतात अटी शर्ती वाचा.
  • सदर मनोरंजन खेळामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची संयोजकानी काळजी घ्यावी.
  • कार्ड रुममध्ये फक्त क्लबमधील सदस्याकरीता त्यांचे मनोरंजनार्थ पत्याचे खेळाची वस्तु केली आहे. सदस्या व्यतिरिक्त इतर कुणासही प्रवेश अनुज्ञेय राहणार नाही.
  • रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही. यांची संयोजकांला काळजी घ्यावी लागते.
  • विशेष बाब म्हणजे - सदर मनोरंजन खेळाबाबत लोकाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास परवाना रद्द करण्यात येईल.
  • 18 वर्षाखालील मुलांना प्रवेश देण्यात येवु नये.
  • वरील अटीचे व सुचनाचे उल्लंघन केल्याचे निर्दशणास आल्यास कोणतीही पूर्व सुचना न देता परवाना रद्द करण्यात येईल.  असे नियम असले तरी लोकांच्या तक्रारी जाऊनही काही कारवाही होत नसेल तर आपण संज्ञानी आहातच, मुळात हाच तळागाळातला विकास सुरु आहे कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. (aamcha vidarbha) (rajura)

राजकारण्यांनों, कुठे नेऊन ठेवत आहे
"महाराष्ट्र माझा, चंद्रपूर जिल्हा माझा, राजुरा विधानसभा क्षेत्र माझा"
लवकरच वाचा गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा येथे सुरु असलेल्या क्लब ची बातमी. 


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top