Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिवती तालुक्यातील विविध मागण्यां करिता मस्की दाम्पत्याचा लढा सुरु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. ४ ऑक्टॉबर २०२३) -         जिवती तालुक्यातील विविध मागण्यांकरिता भारत राष्ट्र समितीचे बाबाराव मस्...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. ४ ऑक्टॉबर २०२३) -
        जिवती तालुक्यातील विविध मागण्यांकरिता भारत राष्ट्र समितीचे बाबाराव मस्की व शोभा मस्की हे दोघेही दि.15 ऑक्टॉबर 23 पासून मागण्या पूर्ण होईपर्यंत बस स्टॅन्ड जवळील हनुमान मंदिराच्या आवारात दोघेही अंगावर काळे वस्त्र परिधान करून व अंगावर लोखंडी बेड्या घालून आंदोलने करणार आहे. मात्र त्या आगोदरच मस्की दाम्पत्य हे जिवती तालुक्यातील विविध गाव व भागांना भेट देत सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणून घेत आहे. तत्पूर्वी बाबाराव मस्की व त्यांच्या चमूने तहसीलदारांना निवेदन सादर केले. (babarao maski)
        मस्की दाम्पत्यांच्या आंदोलनाला आदिवासी समाजाचे काही लोकांनी मस्की दाम्पत्यांची भेट घेत आदिवासी समाजाचा शेतीचे सातबारा, घरपट्टी साठी आंदोलनाला साथ देण्याची विनंती केली. तसेच शेतकऱ्यांनी रानडुकरांचा बंदोबस्त साठी आंदोलनाला सहकार्य करण्याची विनंती केली. मस्की दाम्पत्यांच्या आंदोलनाला उत्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या आहे. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top