Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपुरात डॉक्टर्स संघटनेचा निषेध आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खासदार हेमंत पाटलांना 'डीन'कडून टॉयलेट साफ करून भोवले  खासदार पाटलांनी माफी मागावी 'मार्ड' ने इशारा देत केले आंदोलन आमचा विद...

खासदार हेमंत पाटलांना 'डीन'कडून टॉयलेट साफ करून भोवले 
खासदार पाटलांनी माफी मागावी 'मार्ड' ने इशारा देत केले आंदोलन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपुर (दि. ०५ ऑक्टॉबर २०२३) -
        नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूतांडवानंतर अनेक नेत्यांनी रुग्णालयाला भेट दिली. यामध्ये शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हे देखील होते. मात्र रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडून टॉयलेट स्वच्छ करुन घेतले. आता ही कृती त्यांना चांगलीच महागात पडत असून खासदार पाटील यांच्याविरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय खासदार हेमंत पाटील यांनी माफी न मागितल्यास महाराष्ट्र राज्य निवासी डाॅक्टर्स राज्यव्यापी संघटना मध्यवर्ती मार्ड संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे, त्याच अनुषंगाने आज चंद्रपुरात डॉक्टरानी काळी फीत लावत निषेध नोंदविला. (MP Hemant Patal was made to clean the toilet by 'Dean')

        तत्पूर्वी मार्डने जारी केलेल्या पत्रकात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकारामुळे केवळ अधिष्ठात्यांचे मानसिक खच्चीकरण झाले नाही. तर ही संपूर्ण डॉक्टरांसाठी अपमानास्पद गोष्ट आहे, तरी संबंधित लोकप्रतिनिधी यांनी तत्काळ झाल्या प्रकाराबद्दल माफी मागावी. अशी मागणी करत खासदार पाटलांचा निषेध केला. (MP Patal protested by warning 'Mard' to apologize)

        नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणानंतर खासदार हेमंत पाटील रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांनी अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांना त्यांच्या कार्यालयातील आणि रुग्णालयातील एका वार्डातील शौचालयाची सफाई करायला लावली. हे प्रकरण हेमंत पाटील यांच्या अंगलट येताना दिसून येत आहे. या प्रकरणी अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांच्या तक्रारीवरुन खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Mard Association of Resident Doctors of Government Medical College, Chandrapur)

        चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटेनच्या वतीने काली फीत लावून निषेध निंदविण्यात आला. निवासी, शिकाऊ डॉक्टर्स व विविध संघटनेच्या डॉक्टरांनी खासदार पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी केली. असे कृत्य संघटना खपवून घेणार नाही असा इशाराही दिला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा डॉ. तेजस्विनी चौधरी, रोहित होरे, प्रशांत मगदूम, ऋतूजा गांगुर्डे आदींची उपस्थिती होती. (aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top