Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध मागण्यांना घेऊन सुरज ठाकरे यांचे आमरण उपोषण सुरु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १५ ऑक्टॉबर २०२३) -         विविध जनताभिमुख मागण्यांच्या पूर्ततेकरिता आम आदमी पार्टी चे ((Suraj Thackera...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १५ ऑक्टॉबर २०२३) -
        विविध जनताभिमुख मागण्यांच्या पूर्ततेकरिता आम आदमी पार्टी चे ((Suraj Thackeray)) सुरज ठाकरे, जिल्हाध्यक्ष कामगार संघटन तथा उपजिल्हाध्यक्ष हे आज दि. १८/१०/२०२३ पासून विविध मागण्यांना घेऊन आमरण उपोषणास बसले आहेत. 

या आहेत मुख्य मागण्या 
  • राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत येत असलेले रस्ते तसेच स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असलेले रस्ते विशेषतः राजुरा ते बामणी नांदा फाटा ते वणी, सास्ती-गोवरी, गोंडपिंपरी तालुक्यातील गोंडपिंपरी ते चंद्रपूर मार्गावरील वनविभागाच्या डेपो पासून धानापुर फाटा इत्यादी रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यात तात्काळ सुधारणा करून नमूद सर्वच रस्त्यां बाबत कंत्राटदार व जबाबदार अधिकारी यांची नावे व मोबाईल क्रमांक स्पष्टपणे दृष्टिक्ष पास पडेल अशा पद्धतीने फलक लावण्यात लावावे. 
  • राजुरा विधानसभा क्षेत्रातील सिमेंट उद्योग, व कोळसा खाणींमध्ये व इतर उद्योगांमध्ये किमान ८०% रोजगार (नोकरी) हा स्थानिकांनाच मिळावा यासाठी कायदा करणे. 
  • शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या समस्त शासकीय योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता व त्याची अंमलबजावणी करण्याकरिता महसूल विभागाने विशेष पथकाची स्थापना करावी, ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमीत परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना तात्काळ योजनेनुसार 50 हजार रुपये द्यावेत. तथा अतिवृष्टीमुळे गेल्या तीन वर्षांमध्ये नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वे मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ करण्यात आला असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून खऱ्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला मदत देण्यात यावी. तथा कर्जाचे पुनर्गठन शेतकऱ्याच्या सहमतीशिवाय करू नये. राजुरा तालुक्यांमध्ये मौजा बामनवाडा व चुनाळा येथे महसूल विभागाच्या जमिनीवर गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू आहे. ते तात्काळ बंद करावे व ज्यांनी हे अवैध उत्खनन केले आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच संपत्तीच्या झालेल्या नुकसानाची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी.
  • सोयाबीन वर आलेल्या अळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांना एकरी २५,०००/- ची मदत  दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात यावी. तसेच घटनास्थळी जाऊनच पंचनामे करावेत व पंचनामे करत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव कुठल्याही शेतकऱ्यांसोबत होऊ नये.
  • राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस शिपाई संदीप बुरडकर याच्या विरोधात असंख्य तक्रारी असताना देखील भ्रष्टाचार करून नेत्यांचा दबाव आणून पोलीस विभागातील उच्चाधिकाऱ्यांवर नेत्यांच्या दबावामुळे राजुरा पोलीस स्टेशन येथे त्याची केलेली बदली ही तात्काळ रद्द करून त्यास राजुरा तालुका सोडून इतरत्र कुठेही नियुक्ती द्यावी.
  • दुर्गापूर पोलीस ठाण्याचे माजी पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्याबाबत आय पेक्षा अधिक संपत्ती जमा करण्याचे सबळ पुरावे मी शासनाकडे वेळोवेळी दिलेले आहेत. याबाबत तक्रार देखील केली आहे, परंतु अजून पर्यंत शासनाने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देखील निवेदन दिलेले असताना अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही व चौकशी त्यांच्यावर लावण्यात आलेली नाही. ती तात्काळ त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कार्यवाही करून त्यांनी अवैध मार्गाने जमवलेली संपत्ती जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
  • राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारावर सर्वप्रथम अधिकार हा स्थानिक तरुणांना न देता वेकोली अंतर्गत सुरू असलेल्या सर्व खदानींमध्ये परप्रांतीयांचा भरणा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. यापैकी आजच्या स्थितीमध्ये जवळपास सर्वच खदानी या चढ्ढा यांच्या कंपनीकडे उत्खनना करता आहेत, वारंवार वेकोली ला विनंती पत्र देऊन आंदोलने करून देखील वेकोली याबाबत उदासीन आहे. स्थानिक तरुणांनाच त्या ठिकाणी काम मिळायला हवे अशी मागणी करण्यात आली आहे. 
  • राजुरा विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सर्व सिमेंट कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जात नसून तेथे देखील परप्रांतीयांचा भरणा मोठ्या प्रमाणावर केलेला आहे तसेच अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीमध्ये काम करत असलेल्या कामगारांना आजही 26 दिवस ड्युटी मिळत नाही ती  त्यांना देण्यात यावी व स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावे ही मागणी करण्यात आली आहे. 
  • राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व नगरपरिषद व पंचायत समिती अंतर्गत सफाई कर्मचारी तसेच इतर ठेकेदारी पद्धतीमध्ये काम करत असलेल्या सर्व कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार किमान वेतन जी आर नुसार पेमेंट देण्यात यावे.. (चंद्रपूर महानगरपालिका तसेच पोंभुर्णा नगरपरिषद येथे कामगारांना जीआर नुसार पेमेंट देण्यात येत आहे) तसेच कामगारांना नगरसेवक खाजगी वापराकरिता आपापल्या घरी सफाई करण्यास घेऊन जातात ते तात्काळ बंद करावे.
  • राजुरा विधानसभा क्षेत्रामधील जीवती गोंडपिंपरी राजुरा तथा कोरपणा या तालुक्यामध्ये सामान्य जनतेच्या पट्ट्यांचे प्रश्न शासनाने अजून पर्यंत सोडविलेले नाही अथवा त्याकरता विशेष प्रयत्न देखील करत असताना शासन दिसत नाही पट्ट्यांचे प्रश्न तात्काळ मार्गे लावावी ही मागणी करण्यात आली आहे. 
  • विरूर स्टेशन रोड असिफाबाद मार्ग तालुका राजुरा येथे शाळेचा, चर्च चा तथा गावकऱ्यांचा विरोध असताना देखील त्या ठिकाणी कार्ड रूम/ कार्ड क्लब (परवाना क्र- GB/D-VII/T-2/2019/3) नुसार क्लबला परवानगी देण्यात आली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी.
  • प्रकाश संभाजी खडसे राहणार राजुरा यांचे नगरपरिषद राजुरा यांच्याकडे शिवाजी संकुल येथील सुपर मार्केट मधील गाळा क्रमांक ३ (तीन) याची अनामत रक्कम रुपये २,१७,००० (दोन लाख सतरा हजार) ही गेल्या एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून रक्कम परत मिळावी यासाठी लेखी विनंती करून देखील नगरपरिषद राजुरा यांच्याद्वारे त्यांची रक्कम त्यांना परत न मिळाल्या मुळे श्री. प्रकाश संभाजी खडसे यांची अनामत रक्कम २,१७,००० (दोन लाख सतरा हजार रुपये) परत मिळवून देण्यात यावी.
        जनहिताच्या अशा विविध मागण्यांना घेऊन आम आदमी पार्टीचे सुरजभाऊ ठाकरे, जिल्हाध्यक्ष कामगार संघटन तथा उपजिल्हाध्यक्ष, चंद्रपूर हे मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणास बसून राहणार आहे. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top