Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: युवा विकास मंच चे अध्यक्ष आदित्य भाके यांची विविध मागण्या घेऊन आमरण उपोषणाला सुरवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आप चे नेते सूरज ठाकरे यांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर करत उपोषणाला सुरवात आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १५ ऑक्टॉबर २०२३) -         सध्...

आप चे नेते सूरज ठाकरे यांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर करत उपोषणाला सुरवात
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १५ ऑक्टॉबर २०२३) -
        सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवात गरब्याची धूम सुरू आहे. निवडणुका लागेल या उद्देशाने अनेक नेत्यांनी गरबा आयोजित करत एकेमकांची स्पर्धा दाखविण्याचा विडा उचलला आहे. परंतु सर्व गरबा महोत्सव मध्ये धुंद असताना राजुरा विधानसभेतील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता सूरज ठाकरे यांनी जनतेच्या हिताच्या अनेक मागण्या हाती घेत आमरण उपोषणाच हत्यार हाती घेत बेजबाबदार आजी - माजी आमदाराला धडा शिकविण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांना नवरात्रात तरी सद्बुद्धी यावं या उद्देशाने आमरण उपोषणाला तहसील कार्यालय समोर सुरावात केली आहे. या उपोषणाला पहिल्याच दिवशी युवा विकास मंच चे अध्यक्ष आदित्य भाके यांनी उपोषणाला स्वतः बसून पाठींबा जाहीर केला आहे.
  1. राजुरा तालुक्यातील वरुर् रोड येथील जुगार क्लब बंद करण्यात यावा.
  2. राजुरा शहरातील अनीधिकृत बॅनर काढण्यात यावे.
  3. राजुरा तालुक्यातील निराधारांचे थकीत पैसे त्वरित शासनाने जमा करावे.
  4. राजुरा तालुक्यातील अवैध्य व्यवसायावर कारवाई करण्यात यावी.
  5. राजुरा तालुक्यातील अवैध्य मुरूम उत्खणाची चौकशी करण्यात यावी.
       तसेच सूरज ठाकरे यांच्या जनहिताच्या मागण्या पूर्ण होत पर्यंत आमरण उपोषण करत पाठिंबा जाहीर करत असल्याचे आदित्य भाके यांनी जाहीर केले. तसेच या उपोषणाला प्रकाश खडसे यांनी पाठिंबा देत उपोषणाला सुरवात केली आणि अनेक संघटनांनी पत्र देत उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top