Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विरुर येथे ग्रामीण कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी विरूर स्टेशन (दि. २१ ऑक्टॉबर २०२३) -         राज्यातील 511 प्रमोद महाजन ग्रामिण विकास कौशल्य केंद्रा...

आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी
विरूर स्टेशन (दि. २१ ऑक्टॉबर २०२३) -
        राज्यातील 511 प्रमोद महाजन ग्रामिण विकास कौशल्य केंद्राचे उद्घाटन नुकतेच विरुर येथील बाजार चोकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडला. यावेळी राजुरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी, तहसीलदार ओमप्रकाश गोंड (Tehsildar Omprakash Gond), मंडल अधिकारी साळवे, विरुर चे ठाणेदार जयप्रकाश निर्मल, ग्रामसेवक नैताम, सरपंच अनिल आलाम, केंद्र प्रमुख राजरातन वानखेडे, आयटीआय प्राचार्य व कर्मचारी, गुरुनानक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी उपयुक्त व स्थानिक रोजगार निर्माण होईल अशा प्रकारचे कौशल्य मोफत शिकविल्या जाणार या व्यतिरिक्त सर्व विध्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल, कॉम्पुटर मार्गदर्शन, पर्सलिटी विकास, कम्युनिकेशन स्किल प्रशिक्षण दिले जाणार आहेत. या प्रशिक्षनातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभा राहता येऊन रोजगार उपलब्ध होईल असा आशावाद यावेळी भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रणय येरोजवार, शरद सावंत व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (aamcha vidarbha) (rajura) (wirur station)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top