Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दांडिया महोत्सव समिती कडून आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी विरूर स्टेशन (दि. २१ ऑक्टॉबर २०२३) -         राजुरा तालुक्यातील विहीरगांव येथे दांडिया महोत्सव समिती...

आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी
विरूर स्टेशन (दि. २१ ऑक्टॉबर २०२३) -
        राजुरा तालुक्यातील विहीरगांव येथे दांडिया महोत्सव समिती द्वारे मोफत आरोग्य तपासणी व उपचार‎ शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचा १०४ रुग्णांनी लाभ घेतला.‎ इच्छुक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले, उद्घाटन तहसिलदार ओमप्रकाश गोंड यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार शेखर तेलंग, वैद्यकीय अधिकारी आर.के. कुळमेथे, रियाज शेख, इर्शाद शेख, स्नेहा कनकम, डी.एन.जाधव, रक्तदान बॅंकचे प्रतिनिधी पवार व त्यांची टीम, दांडिया महोत्सव समिती अध्यक्ष राहुल मोहुर्ले, शुभम वाघमारे, राहुल देवईकर, मयुर वांढरे, गणेश चंदनखेडे, शंकर बोधे, संकेत खेडेकर, राजकुमार वांढरे, निखिल सुपारे, केतन वांढरे, हर्षल झाडे, मयंक वांढरे, प्रतिक खेडेकर, गौरव बोबडे, सार्थक बोढे, तृप्ती गौरकार, स्वेता येरेवार, रोहिणी सोनुलै, चेताली मोरे, सानिया भटारकर, वंशिका बोढे, वृणाली भोयर उपस्थित होते. 

        यावेळी तहसीलदार ओमप्रकाश गोंड (Tehsildar Omprakash Gond) यांनी सांगितले कि, आरोग्य शिबीर हे समाजातील लोकांना एकञ आणण्याचे कार्य करते. आपण एकत्र आहो आपण रक्तदान करतो ते गरजुना कामी येते यात जाती धर्म काही नाही असा संदेश आपण समाजातील लोकांना या शिबिरांच्या माध्यमातून देत असतो. यावेळी त्यांनी दांडिया महोत्सव समितीच्या चांगल्या कार्याचा सुध्दा उल्लेख केला. संचालन इर्शाद शेख तर आभार प्रदर्शन शिक्षिका वाघमारे यांनी केले. (aamcha vidarbha) (rajura) (wirur station)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top