Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: डॉ.लीना हिने लोकसेवा आयोगाची प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय अधिकारी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात केली उत्तीर्ण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुक्या जनावरांची सेवा करण्याचे स्वप्न झाले पूर्ण आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. २१ ऑक्टॉबर २०२३) -         राजुरा येथील व्यापारी विठ्...

मुक्या जनावरांची सेवा करण्याचे स्वप्न झाले पूर्ण
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २१ ऑक्टॉबर २०२३) -
        राजुरा येथील व्यापारी विठ्ठलराव येवले आणि जिजामाता विद्यालय राजुरा येथील मुख्याध्यापिका इंदिरा येवले यांची मुलगी डॉ. लीना येवले यांनी (Public Service Commissions) लोकसेवा आयोगाची प्रथम श्रेणी पशूवैद्यकीय अधिकारी (First Class Veterinary Officer) ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली. कालच रात्री आयोगाने निवड यादी प्रसिद्ध केली आणि राजुरा शहरात मानाचा तुरा रोवला. (The dream of serving dumb animals has come true)

        डॉ. लीना यांचे दहावी पर्यंत शिक्षण स्थानिक स्टेला मॉरिस इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढील शिक्षण नागपूर येथे पूर्ण करून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम मराठवाडा विभागात उदगीर येथे पूर्ण केले. सुरुवातीपासूनच मेहनती आणि हुशार असलेली डॉ. लीना (Dr. Leena Yevle) हिने मुक्या प्राण्यांना सेवा देण्याचे स्वप्न बघितले. स्वप्न पुर्ण झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. घरी शैक्षणिक वातावरण असल्याने आई वडिलांचे सतत प्रोत्साहन मिळाले. तिच्या यशामुळे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांत चैतन्य निर्माण झाले असून पुन्हा जोमाने कामाला लागले आहे. तिच्या यशामुळे धनगर समाजातील प्रथमच महिला मोठ्या पदावर पोहचलयाचा आनंद व्यक्त करण्यात येत असून डॉ. मंगेश गुलवाडे, कैलास उराडे, सुधीर घुरुडे, साईनाथ बुचे, पुंडलिक उराडे, भाऊराव खाडे, अनंता गोखरे, दिनेश पोतले, प्रशांत ढवळे, गजानन दवंडे, संजय कन्नावार, ईश्वर बुचे, बंडू पोतले, द्रौपदाताई पोतले, संध्या ढवळे, घोरूडे ताई, उराडे मॅडम यांनी अभिनंदन केले. (aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top