Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: हातचे सोयाबीन गेले; मदतही मिळेना BRS ने पेटविली सोयाबीनची होळी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
काय म्हणाले भूषण फुसे - बघा व्हिडीओ आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २३ ओकटोबर २०२३) -         नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकावर ऐन दिवाळ...

काय म्हणाले भूषण फुसे - बघा व्हिडीओ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २३ ओकटोबर २०२३) -
        नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकावर ऐन दिवाळीच्या तोंडावर पिवळा मोझाक रोगाने आक्रमण केले. डोळ्यादेखत सोयाबीन पीक उध्वस्त झाले. मदती करिता बळीराजा माय बाप सरकारकडे डोळे लावून होता. मात्र अद्यापही मदतीचा नावाने बळीराजाचे हात रिकामेच आहे. सरकारवर बळीराजा संताप व्यक्त करीत आहे. अश्यात बळीराजाचा सोबत बीआरएसचे भूषण फुसे (Bhushan Phuse) खंबीरपने उभे झालेत. बळीराजाना सोबत घेत त्यांनी सोयाबीन पिकाची तहसील कार्यालयाच्या गेटवरच होळी पेटविली. (bharat rashtra samiti)

        निसर्गाचा लहरीपणामुळे बळीराजा संकटात सापळाला आहे. यामुळ बळीराजाच्या डोक्यावर आर्थिक संकटाचे वारे वाहत आहे. अशा स्थितीत सरकारनं मदतीचा हात पुढे करायला हवं होतं, ही माफक अपेक्षा बळीराजाची आहे. मात्र बळीराजाचे हात कोरडेच आहेत. कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलल आहे. नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे पिवळा मोजक रोगाने मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात गुरढोर सोडलीत. तर काहींनी उभ्या पिकात ट्रॅक्टर लावली. जिल्ह्यात ६७.७६६ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. यापैकी ५३ हजार हेक्टर म्हणजेच जवळपास ८० टक्के सोयाबीन पिकावर पिवळा मोझाक रोगाचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याना आर्थिक पॅकेज जाहीर करून त्यांच्या बँक खात्यात त्वरित पैसे जमा करण्याची मागणी घेत बीआरएसने मोर्चा काढला. राजुरा शहारात सोयाबीन पिकाची होळी केली. यावेळी सविता वझे, ज्योती नळे, अनुसूर्या नूती, मीनाक्षी मून, राकेश चिलकुलवार, आशिष नामवाड, लखन अडबाले, महेंद्र ठाकूर, सनी रेड्डी, सुभाष हजारे, श्रीनिवास, सुबोध चिकटे, इस्लाम शेख, विजय राठोड, राकेश उपरे, काटम अण्णा व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. (rajura) (chandrapur) (aamcha vidarbha)



Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top