Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आदित्य भाके यांच्या उपोषणातील जनहितार्थ मागण्या पूर्ण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सूरज ठाकरे यांच्या उपोषणाला दिला होता पाठींबा मनसे जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे व आप चे नेते सुरज ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य भाके यांनी उपोषण...

सूरज ठाकरे यांच्या उपोषणाला दिला होता पाठींबा
मनसे जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे व आप चे नेते सुरज ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य भाके यांनी उपोषण सोडले
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २० ऑक्टॉबार २०२३) -
        सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवात गरब्याची धूम सुरू आहे. निवडणुका लागेल या उद्देशाने अनेक नेत्यांनी गरबा आयोजित करत एकेमकांची स्पर्धा दाखविण्याचा विडा उचलला आहे. परंतु सर्व गरबा महोत्सव मध्ये धुंद असताना राजुरा विधानसभेतील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता सूरज ठाकरे यांनी जनतेच्या हिताच्या अनेक मागण्या हाती घेत आमरण उपोषणाच हत्यार हाती घेतल होत आजी - माजी आमदाराला धडा शिकविण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांना नवरात्रात तरी सद्बुद्धी यावं या उद्देशाने आमरण उपोषणाला तहसील कार्यालय समोर सुरावात केली होती. या उपोषणाला पहिल्याच दिवशी युवा विकास मंच चे अध्यक्ष आदित्य भाके यांनी उपोषणाला स्वतः बसून पाठींबा जाहीर केला होता. (Suraj Thackeray's hunger strike was supported)
  • राजुरा तालुक्यातील वरुर् रोड येथील जुगार क्लब बंद करण्यात यावा.
  • राजुरा शहरातील अनीधिकृत बॅनर काढण्यात यावे.
  • राजुरा तालुक्यातील निराधारांचे थकीत पैसे त्वरित शासनाने जमा करावे.
  • राजुरा तालुक्यातील अवैध्य व्यवसायावर कारवाई करण्यात यावी.
  • राजुरा तालुक्यातील अवैध्य मुरूम उत्खणाची चौकशी करण्यात यावी.
        अश्या आदी मागण्या शासनाने पत्राद्वारे लेखी आश्वासन देऊन मान्य केल्या.उपोषणस्थळी मनसे चे जिलाध्यक्ष मंदिप रोडे यांनी भेट दिली. आप चे नेते सुरज ठाकरे व मनसे जिल्हाध्यक्ष मंदिप रोडे यांच्या उपस्थितीत आदित्य भाकें यांनी उपोषण सोडले, यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष विष्णू बुजोने, राजुरा उप तालुकाध्यक्ष रोहित बत्ताशंकर, वाहतूक तालुकाध्यक्ष अमोल मेश्राम, शहर अध्यक्ष कित्तू मेडपल्लीवर व उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha) (Aditya Bhake broke his hunger strike in the presence of MNS district president Mandeep Rode and AAP leader Suraj Thackeray)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top