Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नांदाफाटा येथे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर जिल्ह्यात 15 नवीन केंद्र तर राज्यात एकूण 511 केंद्राचे उद्घाटन संपन्न आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि...

चंद्रपूर जिल्ह्यात 15 नवीन केंद्र तर राज्यात एकूण 511 केंद्राचे उद्घाटन संपन्न
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २० ऑक्टॉबार २०२३) -
        राज्यातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण विकास कौशल्य केंद्राचे उद्घाटन नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. कोरपणा तालुक्यातील नांदाफाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये सदर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. (15 new centers have been inaugurated in Chandrapur district and a total of 511 centers have been inaugurated in the state)

        यावेळी कोरपना पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी पेंदाम, अजय चंद्रपट्टन जिल्हा नोडल अधिकारी चंद्रपूर, गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव, संस्थेचे संस्थापक रवींद्रलाल श्रीवास्तव, माजी सरपंच श्यामसुंदर राऊत, प्राचार्या अलेक्झांडरिना डिसूजा, उद्योजिका पूर्णिमा श्रीवास्तव (Entrepreneur Purnima Srivastava), कामगार नेते साईनाथ बुच्चे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे कोरपना प्राचार्य विजय दूपारे यांचे सह तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, महाविद्यालयीन विद्यार्थी तथा शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभा राहता येऊन रोजगार उपलब्ध होईल असा आशावाद यावेळी भाषणातून नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. (gadchandur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top