राजुरा (दि. ३ ऑक्टॉबर २०२३) -
मागील पाच वर्षपासून राज्यातील राजकीय खेचताना आणि नेत्यांच्या खुर्ची मोहापायी राज्याची दैनावस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत असून त्यातच राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. बाह्ययंत्रणेकडून कंत्राटी भरतीच्या निर्णयानंतर सरकारी शाळा खासगी कंपनीच्या दावणीला बांधण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. आता राज्यातील सीमावर्ती भागात मनोरंजनासाठी म्हणून करमणुकीच्या उदेशाने काही अटी व शर्ती सह फक्त करमणुकीसाठीच महाराष्ट्र शासना द्वारे विविध प्रकारच्या संस्थांना परवाने दिले जात असून त्या परवाना मध्ये दिलेल्या अटी व शर्तींचे सर्रास उल्लंघन करीत प्रशासनाला हाताशी घेऊन अनेक क्लब परवानाधारक हे मोठ्या प्रमाणावर लाखो करोडो रुपयांचा आलिशान जुगार अड्डा चालवत असल्याचे अनेकदा समोर आले. (Where will Maharashtra take me?) (Outcry among women due to entertainment clubs) (manoranjan club) (warur road)
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा परवानांना पुन्हा नूतनीकरण देण्यात येत आहे, राजुरा तालुक्यातील आसिफाबाद रोडवर असलेल्या वरुड रोड या गावानजीक जुगार अड्डाच या क्लबच्या नावाखाली सुरू केला असून विविध सामाजिक संघटने द्वारे या मनोरंजन क्लब विरुद्ध आक्षेप घेण्यात येत आहे. या मनोरंजन क्लब मध्ये दररोज व विशेषकर सुट्टीच्या दिवशी तेलंगणा राज्यातील लोकांचा येथे अक्षरशः गोंधळ पाहावयास मिळत आहे. वरुर रोड गावात नियम धाब्यावर बसवून टिव्ही, मोबाईलच्या जमान्यात "मनोरंजनाच्या" नावाखाली मनोरंजन क्लब ला परवानगी देण्यात आली आहे. या क्लबच्या परिसरात धार्मिक स्थळे, शाळा असून याच मार्गाने शेतात जाणाऱ्या महिला शेतात जा-ये करीत असतात. या क्लब मध्ये शेकडोच्या घरात लोक येत असून त्या लोकांच्या २५-३० गाड्या रस्त्यावर उभ्या असतात. परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेही राज्य शासन राज्यात उद्योगधंदे देऊ शकत नसल्याने मनोरंजन क्लब मध्ये स्थानिकांना रोजगार मिळत आहे मात्र अश्या मिळालेल्या रोजगाराने शासन महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. (aamcha vidarbha) (rajura)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.