भाजप युवा मोर्चा गडचांदूर तर्फे दूध वाटप
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १ ऑक्टॉबर २०२३) -
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्य नांदाफाटा व गडचांदूर येथील निलेश ताजने यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कडून मुस्लिम बांधवांच्या रॅलीचे स्वागत करत शुभेच्छा देण्यात आल्या. सकाळी ९ वाजतादरम्यान नांदाफाटा येथे ईद निमित्य काढण्यात आलेल्या रैलीत आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना दूध वाटप करण्यात आले. त्यानंतर गडचांदूर येथेही मुस्लिम बांधवासाठी दूध वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे निलेश ताजने, नप सदस्य अरविंद डोहे, रामसेवक मोरे, भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार, संदीप शेरकी, शंकर आपुरकर, प्रतिक सदनपवार, इम्रान पाशा, शेख कादर, मुसा, राजीक खान सहित अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (aamcha vidarbha) (gadchandur)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.