Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भारत राष्ट्र समिती राजुरा विधानसभा क्षेत्राची आढा़वा बैठक संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी आमदार बाळासाहेब साळुंखे यांनी घेतला विधानसभेचा आढावा आमचा विदर्भ - दीपिका शर्मा द्वारे राजुरा (दि. ३ ऑक्टॉबर २०२३) -         स्थानिक सं...

माजी आमदार बाळासाहेब साळुंखे यांनी घेतला विधानसभेचा आढावा
आमचा विदर्भ - दीपिका शर्मा द्वारे
राजुरा (दि. ३ ऑक्टॉबर २०२३) -
        स्थानिक संत नगाजी महाराज सभागृहात भारत राष्ट्र समितीचे राजुरा विधानसभा पदाधिकारी व चारही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांद्वारे गठीत आढावा बैठक पूर्व विदर्भ सह समन्वयक माजी आमदार बाळासाहेब साळुंखे गुरुजी (Balasaheb Salunkhe Guruji) यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत त्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला व पुढील अजेंडा सांगितले व या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली.  पक्षाची विधानसभा क्षेत्रात जो पर्यंत 25  हजार सदस्य नोंद होत नाही तो पर्यंत काही होवू शकत नाही ज्यांची संख्या जितकी भारी त्यांना तेवढी भागीदारीनूसार कार्यकर्त्यांनी प्राथमिक व सक्रिय सदस्य संख्याव वाढविण्याच्या सूचना दिल्या. 

         यावेळी BRS चे राजुरा विधानसभा समन्वयक आनंदराव अंगलवार (Anandrao Angalwar) यांनी सांगितले कि, सर्व कार्यकत्यांनी तन मन धनाने पक्ष वाढविण्याकरिता जोमाने कमला लागावे. तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचे अहवाल वाचन केले. याप्रसंगी चारही तालूका व शहर समन्वयक यांनी आपले अहवाल सादर केले व उर्वरित गाव कमेटी लवकरच सादर करणार हे सागितले. याप्रसंगी महिला समन्वयक रेशमा चव्हाण, सह समन्वयक संतोष कुळमेथे, तालूका राजुरा तालुका समन्वयक अजय साकिनाला, गोंडपिपरी तालुका समन्वयक जीवनदास चौधरी, शहर समन्वयक सुनील साखलवार, कोरपना तालुका समन्वयक अरुण पेचे, शहर समन्वयक सुधीर खनके, जिवती तालुका समन्वयक बालाजी करले, विजय राठोड, जिवती तालूका अल्पसंख्याक समन्वयक ईसलाम शेख, बालाजी आत्राम, शंकर आत्राम, सुशिल मडावी, प्रशांत गड्डम, धनंजय बोर्डे, ज्योतीताई नळे, अनसुर्या नुथी, सारिका पचनूर, भुषण फूसे (Bhushan Fosse), राकेश चिलकुरवार (Rakesh Chilkurwar) व बाबाराव मस्की (Babarao Muski) सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीत उपस्थित होते. (BRS) (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top