Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तलवार बाळगणाऱ्या आरोपीला अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर (दि. 15 सप्टेंबर 2023) -         स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथका...

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर (दि. 15 सप्टेंबर 2023) -
        स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने तलवार शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला त्याचे घरी धाड टाकीत अटक केली. भूषण मोतिलाल उसरेटी वय 43 वर्ष असे आरोपीचे नाव आहे. पोळा / तान्हा पोळा सणानिमित्य शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे दिनांक 15 सप्टेंबर रोजी रात्रौला ऑलआउट मोहीम व गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिंग राबवित असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व पथक याना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली कि, छत्रपती वॉर्ड नं.2 बियाणी नगर येथे राहणार भूषण मोतीलाल उसरेटी वय 43 वर्षे या आपल्या घरी धारदार स्टीलची तलवार लपवून ठेवलेली आहे. 

        या खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखेने त्यांचे घरी छापा टाकला असता त्याचा घरातील बेडरूम मध्ये दिवाणचे खाली 'ठेवलेली स्टीलची धारधार खाचे असलेली तलवार किंमत 5 हजार चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी विरूध्द पोस्टे रामनगर येथे कलम 425 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोअ. संतोष येलपुलवार, पो.अ नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार यांनी केली. (Police Station Ramnagar) (aamcha vidarbha)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top