Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरात 17 सप्टेंबर रोजी राजुरा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव सोहळ्याचे थाटात आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अशोक वानखेडे, अशोक चौधरी, विनय गोंडा यांची राहणार उपस्थिती आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. 15 सप्टेंबर 2023) -        दिनांक 17 ...
अशोक वानखेडे, अशोक चौधरी, विनय गोंडा यांची राहणार उपस्थिती
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. 15 सप्टेंबर 2023) -
       दिनांक 17 सप्टेंबर रोजी राजुरा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सवाचे आयोजन सम्राट लॉन सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन दिल्ली येथील जेष्ठ मुक्त पत्रकार अशोक वानखेडे यांचे शुभहस्ते होणार असून जिल्हाधिकारी विनयजी गौडा यांची उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी पुणे येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी राहणार आहेत. (Ashok Wankhede, Ashok Chaudhary, Vinay Gonda will be present)

       या समारोहाला आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अँड.विठ्ठलराव धोटे, अँड.वामनराव चटप, सुदर्शन निमकर, अँड.संजय धोटे यांचेसह माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वामी येरोलवार, मल्लिका येरोलवार, प्रेमीला बरसागडे, आरती चिल्वालार, अँड.निनाद येरने, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार, राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा रंभाताई गोठी, सखी मंच संयोजिका जयश्री देशपांडे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ.उमाकांत धोटे, मुक्तिदिन उत्सव समितीचे मार्गदर्शक प्रा.दौलत भोंगळे, शिवाजी महाविद्यलयाचे प्राचार्य संभाजी वारकड आदींची उपस्थिती राहणार आहे.

       हैद्राबाद - राजुरा मुक्ती संग्राम लढ्याला 75 वर्ष पुर्ण झाली असुन 2023 हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. देशाच्या भौगोलिक पुर्णत्वास आकार देणारा हा लढा देशाचा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीण्यासारखा आहे. यानिमीत्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही १७ सप्टेंबर २०२३, रोज रविवार ला सायंकाळी ५-३० वाजता राजुरा मुक्तीदिन अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावर्षी राजुरा भूषण सन्मानासाठी सात मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. 

       राजुरा क्षेत्रातील पहिले नेत्र शल्य चिकित्सक डाॅ.भैय्यासाहेब नानाजी कल्लुरवार, भारतीय सेनेचे सेवानिवृत्त सुभेदार व शौर्यचक्र प्राप्त शंकर गणपती मेंगरे, जेष्ठ समीक्षक आणि लेखक प्रा.डाॅ.अनंता सूर, छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक दिलीप रमेश बुरडकर, पुणे येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रभाकर पांडूरंग पाचपुते, माहेश्वरी समाजातील पहिली उच्चशिक्षित डॉ. कु.माधुरी गोपाल झंवर, क्षेत्रातील अल्पसंख्याक समाजाची पहिली सनदी लेखापाल कु.सबा शब्बीर खान पठाण या सात मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. 

       या समारोहात सर्व सत्कार मूर्तीचा परिवारासह सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राजुरा-कोरपना-जिवती या तालुक्यातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन राजुरा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सव समितीने केले आहे.
(rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top