Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तात्काळ ई-ऑटो पासिंग करा अन्यथा आरटीओ दंडाची रक्कम व कर्जाचे हप्ते भरा!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांना इशारा!   आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद...

शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांना इशारा!  
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपुर (दि. 15 सप्टेंबर 2023) -
       येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या खुशिया लोकसंचालित केंद्रामार्फत महिला बचत गटांना ई-ऑटो वाटप करुन एक वर्षाचा कालावधी होवून देखील ई-ऑटोची पासिंग करून न दिल्याने आरटीओ कार्यवाहीचा दंड व थकीत कर्जाचे हप्ते व्यवस्थापकांना भरावे लागेल असा इशारा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी दिला. (Shiv Sena's Chandrapur taluka chief Santosh Parkhi warned the managers of Women's Economic Development Corporation!)

       संबंधित विभागाकडून महिला बचत गटांना ई-ऑटो वाटप करून जवळपास एक वर्ष पूर्ण झाले असून देखील आजपर्यंत एकही ई-ऑटो पासिंग करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे आरटीओ विभागाने महिला बचत गटाच्या ई-ऑटोवर कारवाई करणे सुरू केले असता तात्पुरती कार्यवाही न करण्याबाबत विनंती केली आहे. 

       त्याकरीता सर्व ई-ऑटो महिला बचत गटांनी दोन ते तीन महिण्यापासून बंद ठेवले आहे. याबाबत खुशिया लोकसंचालित केंद्र यांना माहिती दिली होती. तरी देखील कुठलीही पासिंगची कारवाई सुरू केलेली नाही. त्यामुळे सर्व ऑटो बंद असल्याने महिला बचत गटाला कर्ज फेडणे कठीण झाले असून तात्काळ पासिंग करून देण्यात यावी. अन्यथा आरटीओच्या कारवाईचा दंडाची रक्कम व कर्जाचे हप्ते चंद्रपुर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांनी भरण्याचा इशारा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी दिला. यावेळी वैद्यकीय जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, उपतालुका प्रमुख बंडू पहानपाटे, तालुका संघटक संजयकुमार शिंदे, उपतालुका प्रमुख सुरेश खापर्डे, उपतालुका प्रमुख अविनाश ऊके व राजू रायपुरे यांची उपस्थित होते. (chandrapur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top