Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तालुकास्तरीय पोषक आहार अभियान स्पर्धेत श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तालुक्यातून अव्वल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. 15 सप्टेंबर 2023) -        महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीन...
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. 15 सप्टेंबर 2023) -
       महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या पोषण आहार मोहिमे अंतर्गत अंबुजा कौशल्य व उद्योजकता विकास संस्थेमार्फत शालेय पोषण आहार सकस थाळी योजना व सकस पोषण आहार या बाबतीमध्ये उपरवाही येथे नुकत्याच विविध स्पर्धा तालुक्याभरातील शाळांसाठी राबविण्यात आल्या होत्या. यामध्ये तालुक्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या दरम्यान पार पडलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये श्री प्रभू रामचंद्र विद्यालयाच्या विद्यार्थिनी वैशाली विजय सातघरे ने प्रथम क्रमांक आणि सानिया तोहिद शेख ने द्वितीय क्रमांक पटकाविला. त्याचप्रमाणे पोषक थाळी सहभाग स्पर्धेमध्ये सुद्धा जोया तोहीद शेख, श्रेया पंचवटी यांना उत्कृष्ट सहभाग पारितोषिक देण्यात आले. सर्व पारितोषिक विजेत्या विद्यार्थिनीचे विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल मुसळे, प्रशिक्षक शिक्षक रामकृष्ण रोगे आणि इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. (korpana) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top