Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत भोयेगाव जिप शाळा तालुक्यातून प्रथम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. 15 सप्टेंबर 2023) -        महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग चंद्रपूर,...
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. 15 सप्टेंबर 2023) -
       महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग चंद्रपूर, जिल्हा क्रीडा परिषद, तालुका क्रीडा समिती कोरपणा यांच्या संयुक्त विद्यमानाने पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आवारपुर येथे 14,17 व 19 वयोगटाखालील मुला मुलींच्या खो-खोच्या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या, ज्यामध्ये तालुक्यातील एकूण 28 शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. मागील शैक्षणिक सत्रापासून अंबुजा फाउंडेशन च्या वतीने तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा सुद्धा शालेय विभागाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊ लागल्या आहे. त्यामुळे मागील वर्षीपासून अनेक क्रीडा प्रकारात माध्यमिक शाळांना मागे टाकत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ह्या अग्रेसर ठरत आहे. त्याची प्रचिती यावर्षी सुद्धा आली असून पार पडलेल्या खो-खोच्या 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोयगाव यांनी प्रथम क्रमांक पटकावित जिल्हास्तरावर जाण्याचा बहुमान मिळवला. त्याचप्रमाणे 17 वर्षाखालील मुलांच्या गटात महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर व मुलींच्या गटात सावित्रीबाई फुले विद्यालय, गढ़चांदुर एकोणवीस वर्षाखालील मुला मुलींच्या गटात माउंट इंग्लिश मीडियम स्कूल नांदा फाटा यांनी प्रथम येण्याचा मान पटकावला. या स्पर्धांमध्ये श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल नांदाफाटा,होली फॅमिली पब्लिक स्कूल गडचांदूर, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर, सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदुर, जि. प. हायस्कूल कान्हारगाव, जि. प. उच्च प्राथमिक शाळा लखमापूर, जिल्हा आदर्श हिंदी विद्यामंदिर गडचांदूर, जि.प. उच्च प्राथमिक शाळा बाखर्डी, एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल बिबी अशा विविध शाळांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. विजयी झालेल्या सर्व संघाचे कोरपणा तालुका क्रीडा समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून पुढील शैक्षणिक क्षेत्रात तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका क्रीडा सचिव प्रमोद वाघाडे यांनी केले आहे. (korpana) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top