Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सुरज ठाकरे यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आप कडून लढणार राजुरा विधानसभा क्षेत्रामधील विधानसभा निवडणूक आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. 12 सप्टेंबर 2023 ) -         सुरज ठा...

आप कडून लढणार राजुरा विधानसभा क्षेत्रामधील विधानसभा निवडणूक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. 12 सप्टेंबर 2023 ) -
        सुरज ठाकरे यांची भूमिका नेहमीच जे सर्वसामान्यांकरिता व देशाकरिता रोखठोक असते, योग्य आहे तेच करायचं व त्याकरिताच आवाज उचलायचा अशी भूमिका ठाकरे यांची राहिलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरज ठाकरे हे युवा स्वाभिमान पक्षाच्या नावाने कामे न करिता फक्त जय भवानी कामगार संघटनेच्या माध्यमातून कामे करीत असल्यामुळे बरेच लोक संभ्रमात असायचे की सुरज ठाकरे हे गेल्या तीन वर्षापासून युवा स्वाभिमान पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असून देखील सदसस्थितीत ते फक्त त्यांच्या संघटनेच्याच माध्यमातून कामे का करत आहेत? आता त्यामागची करणे एक-एक समोर येत आहे, महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपची हुकूमशाही व काँग्रेसची घराणेशाही तथा एका पक्षाची दोन गटे असलेली पक्ष राष्ट्रवादी व शिवसेना या सर्व पक्षांची महाराष्ट्रातील सत्तेत असतानाचे गलिच्छ राजकारण बघून नेमका कोणत्या पक्षावर विश्वास ठेवावा? असा प्रश्न समोर उभा असताना जेव्हा आप पक्षानी केलेल्या विकास कामांची सत्य परिस्थिती बघून तथा आप पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याने व या पक्षाला स्थानिक पातळीवर सक्रियपणे काम करणाऱ्या नेत्याची गरज असल्याने व भविष्यात होणाऱ्या राजुरा विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या अनुषंगाने व आप पक्ष हा बीजेपी तथा काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा कट्टर विरोधी पक्ष असल्याकारणाने व या पक्षाची केलेली कामे पाहता जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांना आप पक्षाने संधी देत आमंत्रित करताच सुरज ठाकरे यांनी सहकाऱ्यांशी चर्चा करून दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी पुणे येथे आप पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार संजय सिंग यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला. व यावेळेस चंद्रपूर जिल्ह्यामधील जिल्हाध्यक्ष कामगार तथा उपजिल्हा अध्यक्ष, जि. चंद्रपूर अशी जबाबदारी सुरज ठाकरे यांना पक्षाने देण्याचे आव्हान दिलेले आहे. यासह भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातून सुरज ठाकरे हे आप पक्षाकडून लढणार हे निश्चित. (AAP will contest assembly elections in Rajura assembly constituency)

        यासह श्री. सुरज ठाकरे यांच्या खाजगी जय भवानी कामगार संघटनेवर पक्षाचा कुठलाही परिणाम होणार नसून संघटनेचे काम देखील सुरळीत सुरू राहील असे यावेळेसचे सुरज ठाकरे यांनी सांगितले. व युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बडनेरा विधानसभा क्षेत्र रवि राणा यांनी तीन वर्ष चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून दिलेल्या जबाबदारी करिता त्यांचे सुरज ठाकरे यांनी मनापासून आभार मानले. व हा पक्ष बीजेपीला समर्पित पक्ष असल्याने या पक्षाला राजीनामा देऊन सुरज ठाकरे यांनी आप पक्षामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश वेळेस सुरज ठाकरे यांचे सहकारी राजुरा येथील ब्लॅक पॅन्थर चे विजय चन्ने, आजवान टाक, अभिजित बोरकुटे आदी सहकारी देखील उपस्थित होते. पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी महाराष्ट्र सह प्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश संगठन मंत्री, भूषण ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुर्हेकर, भिमराव मेंढे, स्वप्निल घागरगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top