Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कत्तलीकरिता जाणारे जनावर तस्करांच्या हातून केले मुक्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्थानीय गुन्हे शाखेची विरूर हद्दीत मोठी कारवाई 24 लाख 17 हजाराचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. 12 सप्टेंबर 2023...

स्थानीय गुन्हे शाखेची विरूर हद्दीत मोठी कारवाई
24 लाख 17 हजाराचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. 12 सप्टेंबर 2023 ) -
        दि. 12 सप्टेंबर 2023 स्थानीय गुन्हे शाखेला माहिती मिळाली कि विरूर हद्दीतून राजूरा मार्गाने मालवाहू 16 चक्का ट्रकमध्ये अवैध्यरित्या जनावर भरून कत्तली करीता तेलंगाना राज्यात घेवून जाणार आहे. अशा खात्रीशीर खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. महेश कोंडावार यांनी स.पो.नि. जितेंद्र बोबडे, पो.हवा. सुरेंद्र महंतो, ना.पो.कॉ. दिपक डोंगरे, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, पो.कॉ. गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदीप मडावी, जय सिंग यांचे पथक कारवाई करीता नेमून यांना आदेशीत केले. (Major operation of local crime branch in Virur area)

        सदर पथक मिळालेल्या खबरे प्रमाणे मौजा सोनुर्ली फाटयाचे आधी रोडवर साफळा लावून व काही कर्मचारी यांनी नाकाबंदी केली असता. खबरे प्रमाणे ट्रक येतांना दिसला त्या ट्रक चालकास थांबण्याचा ईशारा केला असता तो पोलीसांना पाहुन ट्रक न थांबविता पळू लागला त्याचा पाठलाग केला असता सदर चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक सोनुर्ली फाट्या जवळ थांबवून ट्रक सोडून पळून गेला. सदर चालकाचा पोलिसांनी पाठलाग केला मात्र तो फरार होण्यात यशस्वी झाला. सदर ट्रक क्र. TS12 UD9233 ची पोलिसांनी पाहणी केली असता त्यात एकुण गोवंश 31 ज्यात जिवंत गोवंशिय 20 गाय व 10 बैल जनावरे व 01 गाय मृत अवस्थेत पंचनाम्या प्रमाने अंदाजे किंमत 4,17,000/रू व ट्रकची कि. 20,00,000/- असा एकुण 24,17,000/- रू चा माल पंचनाम्याप्रमाने पंचा समक्ष ताब्यात घेण्यात आला. (24 lakh 17 thousand worth of goods seized)

        सदर ट्रक चालका विरूद्ध पो.स्टे. विरूर येथे 429 भादवि, सहकलम 11 (1), (ङ) प्रा. नि. वा. कायदा 1960, सहकलम 5 अ (1),5 ब9, 11 महा. प्रा. संरक्षण कायदा, सहकलम 83,130 / 177 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स.पो.नि. जितेंद्र बोबडे, पो.हवा.सुरेंद्र महंतो, ना. पो.कॉ. दिपक डोंगरे, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, पो.कॉ. गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदीप मडावी, जय सिंग यांचे मदतीने केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.स्टे. विरूर हे करीत आहे. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top