Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नेत्रतज्ञ डाॅ.कल्लुरवार, मेंगरे, सूर, बुरडकर, पाचपुते, कु.झंवर व कु.पठाण यावर्षीचे राजुरा भूषण मानकरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा अमृत महोत्सव समितीची घोषणा राजुरात 17 सप्टेंबर रोजी राजुरा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव सोहळा आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (द...
राजुरा अमृत महोत्सव समितीची घोषणा
राजुरात 17 सप्टेंबर रोजी राजुरा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव सोहळा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. 15 सप्टेंबर 2023) -
        राजुरा अमृत महोत्सव समितीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राजुरा भूषण पुरस्काराची घोषणा राजुरा भूषण निवड समितीचे अध्यक्ष प्राचार्य डी.बी. भोंगळे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी राजुरा मुक्तीदिन अमृत महोत्सव समितीचे प्राचार्य संभाजी वारकड, संयोजक अनिल बाळसराफ, सहसंयोजक मिलींद गड्डमवार, प्रा.विशाल मालेकर, विजय मोरे, मोहनदास मेश्राम, पूर्वा देशमुख, वनिता उराडे उपस्थित होते. (Announcement of Rajura Amrit Mahotsav Committee)

        हैद्राबाद-राजुरा मुक्ती संग्राम लढ्याला 75 वर्ष पुर्ण झाली असुन 2023 हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. देशाच्या भौगोलिक पुर्णत्वास आकार देणारा हा लढा देशाचा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीण्यासारखा आहे. यानिमीत्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही १७ सप्टेंबर २०२३, रोज रविवार ला राजुरा मुक्तीदिन अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावर्षी राजुरा भूषण सन्मानासाठी सात मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. (Rajura Muktisangram Amrit Mahotsav celebration on 17th September in Rajura)

        राजुरा क्षेत्रातील पहिले नेत्र शल्य चिकित्सक डाॅ.भैय्यासाहेब नानाजी कल्लुरवार, भारतीय सेनेचे सेवानिवृत्त सुभेदार व शौर्यचक्र प्राप्त शंकर गणपती मेंगरे, जेष्ठ समीक्षक आणि लेखक प्रा.डाॅ.अनंता सूर, छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक दिलीप रमेश बुरडकर, पुणे येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रभाकर पांडूरंग पाचपुते, माहेश्वरी समाजातील पहिली उच्चशिक्षित डॉक्टर कु.माधुरी गोपाल झंवर, क्षेत्रातील अल्पसंख्याक समाजाची पहिली सनदी लेखापाल कु.सबा शब्बीर खान पठाण या सात मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. दिनांक 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या  समारोहात या सर्वांचा परिवारासह सत्कार करण्यात येणार आहे. या सर्व मान्यवरांचे राजुरा मुक्तीदिन अमृत महोत्सव समितीने अभिनंदन केले आहे. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top