Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आपची कार्यकारिणी व जनशक्ती अभियानाची बैठक संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुरज ठाकरे व मयूर रायकवार यांनी बैठकीत जिल्ह्यामध्ये आपची सदस्यसंख्या लाखाच्या घरात कशी जाईल यावर चर्चा आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजु...
सुरज ठाकरे व मयूर रायकवार यांनी बैठकीत जिल्ह्यामध्ये आपची सदस्यसंख्या लाखाच्या घरात कशी जाईल यावर चर्चा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १६ सप्टेंबर २०२३) -
        आम आदमी पार्टीची राजुरा विधानसभा क्षेत्र कार्यकारिणी गठन व जनशक्ती अभियान बाबत बैठक जिल्हा उपाध्यक्ष सुरज ठाकरे व जिल्हाध्यक्ष मयूर रायकवार यांच्या उपस्थितीत पार पडली.

        नुकतेच आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली असून या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात सुद्धा पक्ष मजबूत करण्याच्या उद्देशाने आम आदमी पक्षाचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याद्वारे महाराष्ट्रात जनशक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाचे ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे लाखो सदस्य जोडण्याचा संकल्प आम आदमी पक्षाने घेतला आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणावर नाराज असलेल्या लोकांशी संपर्क करून आम आदमी पार्टीमध्ये सहभागी होण्याची विनंती या अभियानांतर्गत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे करतील असे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. (Suraj Thackeray and Mayur Raikwar discussed in the meeting how AAP's membership in the district will reach one lakh)

        प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान १५००० सक्रिय सदस्य संपूर्ण जिल्यात जोडण्याची मनशा आम आदमी पक्षाची असून बोले तैसा चाले अशी प्रतिमा असलेला एकमेव पक्ष म्हणजे आम आदमी पक्षच सध्या उरला असून अवघ्या दहा वर्षांमध्ये सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा पक्ष बनला आहे व केलेल्या कामावर मतदान मागणारा एकमेव पक्ष आहे असे यावेळी बैठकीत सुरज ठाकरे यांनी सांगितले. समाजातील विविध क्षेत्रातील लोकांची भेट या अभियानाअंतर्गत घेणे सुरु असून सर्वच स्तरावरून पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे देखील सुरज ठाकरे ((Suraj Thackeray) यांनी यावेळी सांगितले.

        अवघ्या काही दिवसांतच संपूर्ण जिल्ह्यामध्ये सदस्य संख्या ही लाखाच्या घरात जाईल अशा विश्वास देखील जिल्हाध्यक्ष मयूर रायकवाड व सुरज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाशी सामान्य जनतेने जुळावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. बैठकीत विजय चन्ने, सुनील राठोड, मोहम्मद खान, आशिष कुचनकर, सुधाकर काळे, अभिजीत बोरकुटे, जगदीश साठवणे, निखिल बजाइत, निखिल पिदूरकर, आशिष आगरकर व आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top